शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

धामणगाव बाजार समितीत अडत्यांची फसवणूक, व्यापाऱ्याविरूध्द गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: May 28, 2024 17:25 IST

विक्री केलेल्या धान्याचा मोबदला देण्यास नकार.

प्रदीप भाकरे, अमरावती : धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत एका ६४ वर्षीय व्यापाऱ्याने तेथीलच १६ अडत्यांचे पैसे बुडविल्याची तक्रार करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२ध दरम्यान ती फसवणुकीची मालिका चालल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी, अडत व्यापारी पवन लाहोटी (४४, आदर्श कॉलेजसमोर, धामणगाव रेल्वे) यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी २७ मे रोजी रात्री ११.४४ च्या सुमारास आरोपी चंद्रशेखर मदनलाल पसारी (६४, रा. धामणगाव रेल्वे) याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पवन लाहोटी हे धामणगाव रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समिती येथे अडत व्यापारी म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत इतरही बरेच लोक अडत व्यापारी म्हणून काम करतात. लाहोटी व अन्य अडत्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये धान्याचा लिलाव घेतला. लिलाव केलेल्या धान्याचे पैसे देखील अडत व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले. तर, दुसरीकडे विक्री केलेल्या धान्याचा मोबदला १५ ते २० दिवसांनी देतो, अशी बतावणी आरोपी चंद्रशेखर पसारी याने अडत व्यापाऱ्यांना केली. त्यांनी देखील विश्वास व नेहमीचा व्यवहार असल्याने तितके दिवस प्रतीक्षा केली. मात्र, काही महिने उलटून गेल्यानंतरही रक्कम न मिळाल्याने पवन लाहोटी व अन्य १५ अडत व्यापारी पसारींकडे गेले. तेव्हा त्याने आम्हाला पैसे देत नाही, अशी धमकी दिल्याचे लाहोटी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

व्यापारी म्हणून त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतल्याचे देखील लाहोटी यांनी म्हटले आहे. अनेकदा रकमेची मागणी करूनही ती न मिळाल्याने अखेर २७ मे रोजी अडत व्यापाऱ्यांनी दत्तापूर पोलीस ठाणे गाठले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस