अमरावती : येथील सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याच्या नावावर दोघांकडून १३ लाखांची फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली ठाण्यात दोन महिलेसह ७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रानुसार, पवन केने (३३, काटसूर) व दुर्गेश डोईफोडे या दोघा मित्रांना येथील शासकीय बांधकाम विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष देण्यात आले. नाेकरी लागण्यानंतर आरोपींना १२ ऑगस्ट २००७ ते २४ एप्रिल २०२१ या दरम्यान १३ लाख रुपये नेहरू मैदान परिसरात देण्यात आले. आरोपींनी बनावट नोकरीचे आदेश या दोघांनाही दिले. हे नियुक्ती आदेश घेऊन फिर्यादी येथील बांधकाम विभागात पाेहचले असता ते आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी फिर्यादवरून
आरोपी संभाजी सावंत (५५, बदलापूर), मयूर गनेशंकर (४०, नागपूर), सुरेश डोंगरे (४०), अजय डोंगरे (३२) व दिनेश डोंगरे तिन्ही यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व दोन महिलाविरूद्ध भादंविच्या ४२०, ४६७, ४६८, ३४ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.