शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

फ्रॉड; छत्तीसगडमधून सहा आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:24 PM

Amravati : आभासी नफा दाखवून ३१.३५ लाखांनी गंडविले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून परतवाडा येथील एकाला ३१ लाख ३५ हजारांनी गंडविणाऱ्या टोळीतील आणखी सहा आरोपींना ग्रामीण सायबर पोलिसांनी छत्तीसगड राज्यातून बुधवारी अटक केली. या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या दहा झाली आहे. रितेश अजंगले (२४, रा. ठठारी), मायकल साहू (२४, रा. जैजैपुर), रवींद्र यादव (२९, रा. बसंतपूर), अमन हरपाल (३८, रा. कातुल बोर्ड), शैलेंद्रसिंग चव्हाण (३५, रा. भरकापारा) व दिगंत अवस्थी (३८, रा. बनभेडी, छत्तीसगढ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परतवाड्यातील आशिष बोबडे (४४) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फोर्थ इंडियन स्टॉक मार्केट अॅनालिसीस अॅण्ड लर्निंग' या नावाचा शेअर मार्केट ग्रुप जॉईन केला. वेबसाइट लिंकद्वारे त्यांनी ३१.३५ लाखांचे शेअर खरेदी केले, पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ती वेबसाइट बंद दिसून आली. त्यामुळे त्यांनी ग्रुपमधील मोबाइल क्रमांकावर कॉल केला. मात्र, मोबाइलही बंद होता.

बँक खात्यांची साखळीसायबर पोलिसांच्या तपासात आरोपी वेगवेगळे मोबाइल वापरत असून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्ळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठविल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्या बँक खात्यांची साखळी जोडून तपशिलाच्या आधारावर छत्तीसगढमधील जांजगीर, रायपूर, सक्ती येथून चार आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान अन्य आरोपींचा सुगावा लागल्यावर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक १० मे रोजी छत्तीसगढला रवाना झाले होते. तेथून सहा जणांना पुन्हा अटक करण्यात आली.

७० लाख गोठविलेआरोपींनी वापरलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधील ७० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली. आरोपींकडून बँकेचे ३ स्टॅम्प, प्रोप्रायटरचे ३ स्टॅम्प, सरपंचांचे नावे असलेला स्टॅम्प, १७ डेबिट कार्ड, ७४ धनादेश, ६० पासबुक व १ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. ही कारवाई सायबरचे पोलिस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक किरण ऑटे व निर्मला भोई, एएसआय सुनील बनसोड, पंकज गोलाईतकर, सागर धापड, रितेश गोस्वामी, रोशन लकडे, गौरव गनथडे, प्रिया मुंडेकर आदींनी केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीAmravatiअमरावती