लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : शहरात कचरा निक्षेपण भूमी (डम्पिंग ग्राऊंड) नसल्यामुळे कचरा नेमका कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न न.प. प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे उभे झाल्याने न. प. मुख्याधिकारी व तहसीलदारांनी जागेसंदर्भातील शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. जागेची पाहणीसुद्धा झाली. त्यामुळे शहरवासीयांची अस्वच्छतेच्या गर्तेतून लवकरच सुटका होणार आहे.नांदगावनजीक मौजा चिंचोली येथील ५ हेक्टर ५९ आर ई-क्लास जमिनीवर कचरा निक्षेपण भूमी होणार असून, बांधकामासाठी चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा वापर होणार आहे.मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी १३ एप्रिलला यासंदर्भातील प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला व तहसीलदार मनोज लोणारकर यांनी स्थळ निरीक्षण केले. कचरा निक्षेपण भूमीसाठी जागेची पाहणी करताना तहसीलदार मनोज लोणारकर, न. प. मुख्याधिकारी नीलेश जाधव, पाणी पुरवठा सभापती फिरोज खान, विकास दबघडे उपस्थित होते.
नांदगाववासीय घेणार मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:14 PM
शहरात कचरा निक्षेपण भूमी (डम्पिंग ग्राऊंड) नसल्यामुळे कचरा नेमका कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न न.प. प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
ठळक मुद्देडम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी : जागेची पाहणी