अमरावती : जिल्ह्यात सकाळी ११ वाजतानंतर संचारबंदी असताना मार्केटमध्ये नागरिकांचा मुक्त संचार दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाद्वारा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जात नसल्याने हा प्रकार वाढीस लागल्याचे बोलले जात आहे.
--------------------------
मैदानाऐवजी हातगाडीवरच भाजीपाल्याची विक्री
अमरावती : शहरात १ मे पर्यंत भाजीविक्रीसाठी झोननिहाय मैदाने निश्चित करण्यात आलेली असताना हातगाडीवर भाजीविक्री सुरू असल्याचे दिसून येते. प्रशासनाद्वारा नियोजन नसल्यामुळे बहुतेक मैदानांवर कोणीही विक्रेता दिसून येत नाही.
---------------------------
८७० रुग्णांना गुरुवारी डिस्चार्ज
अमरावती : उपचारानंतर बरे वाटल्याने गुरुवारी ८७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या आता ९० हजार ५३० वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ९१.२० आहे.
------------------------
अन्य जिल्ह्यातील १७० रुग्णांचा मृत्यू
अमरावती : जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या मध्यप्रदेश, नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा आदी जिल्ह्यातील १७० संक्रमित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,५३४ झालेली आहे.