ठळक मुद्देवैयक्तिक माहिती लिक होण्याचा धोका : व्हॉट्स अॅप ग्रुपवर महापूर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : ‘मोफत सायकल वितरण योजना, भारत सरकार’ मोठ्या प्रमाणावर ‘व्हॉट्स अॅप’वर व्हायरल होत आहे. सर्व व्हॉट्स अॅप ग्रुपवर या योजनेचा महापूर आलेला आहे. तथापि, अशी योजना नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमार्फत राबविली जात नसल्याची माहिती समोर आलेली आहे. कोणत्याही शासकीय योजनेच्या नावाने वेबसाइटवर माहिती देताना, भरताना त्यात आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने होत आहे.‘फ्री सायकल वितरण योजना, भारत सरकार. सभी लडके और लडकियों को मिलेगी मुफ्त में सायकल. सभी सायकल १५ आॅगस्ट २०१८ को बांटी जाएगी’ असा संदेश देत ‘ँ३३स्र://इँं१ं३-रं१‘ं१.ूङ्म/साईकिल’ या लिंकवर ‘कृपया इस मैसेज को अपने दोस्तो, रिश्तेदारो और सारे ग्रुप्स में शेअर करे ताकी सभी विद्यार्थी इस योजना का लाभ उठा सके’ अशी विनंती करण्यात आली आहेदरम्यान, सदर प्रतिनिधीने या व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्लीक करताच नरेंद्र मोदींचा फोटो राजमुद्रेसह झळकला व ‘प्रधानमंत्री साईकिल योजना २०१८’ असे एक पेज ओपन झाले. त्यामध्ये नाव नोंदणीसाठी आॅनलाइन अर्ज आहे. पूर्ण नाव, वडिलांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, गाव व राज्याचे नाव याची माहिती भरल्यानंतर ‘रजिस्टर’ या बटनावर क्लिक केल्यावर व्हेरिफिकेशनसाठी हा मेसेज १० मित्रांना शेअर करा, नंतरच तुमचा एमआयआर कोड येणार, असा मेसेज येतो. त्यानंतर एकूण १० मेसेज पाठविल्यानंतरसुद्धा काहीच येत नाही. एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. हा व्हायरल मेसेज बोगस असण्याची शक्यता जास्त आहे. सध्या संपूर्ण अचलपूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात नागरिकांमध्ये या मेसेजबाबत चर्चा, चौकशी होत आहेत. झेरॉक्स सेंटर, आॅनलाईन कॅफेवर नागरिक ‘या फ्री सायकल योजनेचे अर्ज उपलब्ध आहे का?’ अशी विचारणा करू लागले आहेत. पंतप्रधानांचे छायाचित्र झळकत असल्याने चटकन विश्वास बसत असला तरी मोफत सायकल वाटप योजना बोगस असल्याचीच माहिती समोर येत आहे.दरम्यान पंतप्रधानाच्या नावावर सायकल योजनेसंदर्भात कुठलीही योजना प्रशासनाकडे नाही. नागरिकांनी आमिषाला भुलू नये, अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली.अचलपूर ठाण्याला अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यावर निश्चित कारवाई करू.- आधारसिंग सोनोने, ठाणेदार, अचलपूर.‘मोफत सायकल वाटप’चा मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:00 PM