अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग हे इतर मागासवर्गीय, अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्ग, तसेच खुल्या गटातील (बी.पी.एल.) उमेदवारांसाठी नि:शुल्क आहेत.
सदर मार्गदर्शन वर्गातून एम.पी.एस.सी., रेल्वे, बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, एल.आय.सी. आदी विभागांतील विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मुलांचे वसतिगृह रोड, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, येथे ६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रवेशाचे अर्ज सादर करावेत. विद्यापीठाच्या मार्गदर्शन केंद्रातच वरील अर्ज उपलब्ध असून, उमेदवारांनी स्वत: ओळखपत्र व दोन पासपोर्ट साइझ फोटो आणणे अनिवार्य आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाणार आहे. सदर परीक्षेची तारीख व वेळ ही विद्यार्थ्यांना यथावकाश ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे.