फोटो - वरूड २५ पी
वरूड : दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून स्व. शालिनी गंगाधर काठीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईच्या रत्ना निधी फाऊंडेशन, विदर्भ प्रेस क्लब आणि सार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात मोफत कृत्रिम अवयव शिबिर पार पडले. यामध्ये विदर्भातून आलेल्या ४० व्यक्तींच्या पायाचे, हाताचे मोजमाप घेण्यात आले.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर आंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर ब्राम्हणे (मुंबई), विदर्भ प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष संजय खासबागे, उपाध्यक्ष अतुल काळे, तालुकाध्यक्ष योगेश ठाकरे, प्रकाश गडवे, स्वप्निल आजनकर, मंगेश काठीवाले, सार फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील सावरकर, बाळासाहेब मगर्दे, महेश पुरोहित, प्रभाकर लायदे, अविनाश बनसोड आदी उपस्थित होते. शालिनी गंगाधर काठीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि जयपूर पॅटर्ननुसार कृत्रिम अवयव दिव्यांगांना २६ नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहेत तसेच याच वेळी दिव्यांगांच्या हात, पायाचे मोजमाप घेण्यात येतील व पोलिओग्रस्तांना काठ्या आणि वाॅकरसुद्धा देण्यात येणार आहेत.