अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी ९२२ संक्रमित रुग्ण आढळून आले, तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य जिल्ह्यांतील दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले असून, त्यांच्या मृत्यूची नोंद त्या जिल्ह्यातील अभिलेखात घेण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात शहरातील कठोरा रोड येथील ७४ वर्षीय पुरुष, गोपालनगर येथील ७० वर्षीय महिला, शोभानगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भानखेड बु. येथील ४० वर्षीय पुरुष, शोभानगर येथील ३८ वर्षीय महिला, दर्यापूर येथील ७१ वर्षीय महिला, वरूड येथील ६५ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ८० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, नांदगाव (खंडेश्वर) येथील ६५ वर्षीय पुरुष, ८५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, मोर्शी येथील ७५ वर्षीय पुरुष, ४४ वर्षीय पुरुष, टाकरखेडा येथील ७० वर्षीय महिला, साईनगर येथील ७२ वर्षीय महिला, जलारामनगर येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. वर्धा येथील ६८ वर्षीय पुरुष, बैतुल येथील ७० वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवारी ९२२ संक्रमित आढळून आले असून, आतापर्यंत ८० हजार ६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दाखल रुग्ण २३१२, तर कोरोनावर मात करून ११२३ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. गृहविलगीकरणात ग्रामीणमध्ये ५९९ तर, १८४ रुग्ण आहेत. १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १२१३ रुग्ण दगावले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण १०८९२, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.९९ टक्के आहे. मृत्युदर १.५० टक्के, तर रुग्ण दुपटीचे प्रमाण ५४ एवढे आहेत.