शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुपमधून ‘कर्णबधिर’जपतात मैत्री

By admin | Published: January 25, 2017 12:01 AM

सोशल मीडियाचा म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा वापर जगभर सुरू आहे. मैत्री जोपासण्यासाठी तर हा मार्ग एकदम ‘स्मार्ट’ ठरतो.

सांकेतिक भाषेत संभाषण : शासकीय दुग्ध योजनेत नोकरी संदीप मानकर अमरावतीसोशल मीडियाचा म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा वापर जगभर सुरू आहे. मैत्री जोपासण्यासाठी तर हा मार्ग एकदम ‘स्मार्ट’ ठरतो. परंतु मूकबधिरांनी सोशल मीडिया कसा वापरायचा. वापरलाच तर मित्रांशी संवाद कसा साधायचा. ऐकण्याची आणि बोलण्याची समस्या आडवी येणारच. पण, म्हणतात ना..‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीनुसार अशाच समस्येचा सामना करणाऱ्या एका मूक-बधिराने ‘फाईन-लँग्वेज’ (सांकेतिक भाषा)चा वापर करून सोशल मीडियावर एक ग्रुप तयार केला आहे. विशेष म्हणजे या ग्रुपचे सगळेच सदस्य ‘व्हिडीओ कॉलिंग’च्या माध्यमातून एकमेकांशी वरचेवर संवादही साधतात. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण सदर मूकबधिर लिपिकाने सार्थ ठरविली आहे. गजानन गाडेकर असे या हरहुन्नरी लिपिकाचे नाव आहे. काँग्रेसनगरातील शासकीय दूध योजना केंद्रात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत गजानन मूकबधिर आहेत. मात्र, या निसर्गदत्त उणिवेचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. त्यांचे कार्यालयीन कामकाज ते अत्यंत पारदर्शकपणे पार पाडतात. ‘हायटेक’ युगात आपण माघारू नये, याची पुरेपूर दक्षताही त्यांनी घेतली आहे. मोठ्या सफाईने ते ‘स्मार्ट फोन’चा वापर करतात. परंतु आपल्याच सारख्या आपल्या मूकबधिर मित्रांशी संवाद साधता येत नाही, त्यांचा आवाज ऐकता येत नाही. अशी खंत त्यांना बोचत होती. यासाठी त्यांनी एक शक्कल लढविली आणि त्यांच्याचसारख्या मूकबधिर मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप व्हॉट्सअ‍ॅपवर तयार केला. आता तंत्रज्ञानाच्या या युगात स्मार्ट फोनचा सकारात्मक वापर करून ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून सांकेतिक भाषेत मित्रांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष चेहरा पाहून भावना शेअर करण्याचा आनंद वेगळाच असतो, असे ते म्हणतात. व्हॉटस्अ‍ॅपवरील या मूकबधिरांच्या ग्रुपमध्ये ११ जणांचा समावेश आहे. याग्रुपला त्यांनी ‘शासकीय कर्मचारी संघटना’ असे नावही दिले. साईनगर परिसरातील रहिवासी गजानन गाठेकर यांचा काही वर्षांपूर्वी त्यांच्या मामाच्या मुलीशी विवाह झाला. त्यांची दोन्ही अपत्ये सुदृढ आहेत. त्यांच्या पत्नीदेखील सामान्य आहेत. त्यांनाही आता गजानन यांची सांकेतिक भाषा कळते. बारावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शासकीय नोकरी मिळविण्याची जिद्द मनाशी बाळगून या नोकरीसाठी आवश्यक टंकलेखन व संगणकाची परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली. यामुळेच त्यांना अपंग कोट्यातून शासकीय दूध योजना केंद्रात कनिष्ठ लिपिकाची नोकरीही मिळाली. पत्नी आणि मुलांशी देखील गजाजन हे याच ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधतात. मितभाषी असल्याने गजानन यांचे कार्यालयातही अनेक मित्र आहेत. दूध योजना केंद्राचे दुग्धशाळा व्यवस्थापक एस.बी.जांभुळे यांचेही त्यांना सहकार्य लाभले आहे. त्यांचे मित्र बी.एस गजभिये देखील त्यांच्याशी सांकेतिक भाषेतच संवाद साधतात. अपंगत्वाचे न्यून न बाळगता ते मित्रांशी संवाद साधून आनंदाने जगत आहेत.