शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

भरचौकात स्टंटबाजी; दुचाकीस्वार सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 1:26 AM

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकार वाहने चालवणाऱ्यांमुळे शहरात दररोज अनेकांचे जीव टांगणीला लागलेले असतात. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता हुल्लडबाजांची टोळकी वर्दळीच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करतात.

ठळक मुद्देबेदरकार वाहतुकीने जीव टांगणीला : आरडाओरडा, ट्रिपल सीट, कर्कश्श हॉर्नने तारांबळ; कारवाईत सातत्य राखण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकार वाहने चालवणाऱ्यांमुळे शहरात दररोज अनेकांचे जीव टांगणीला लागलेले असतात. पोलिसांच्या कारवाईला न जुमानता हुल्लडबाजांची टोळकी वर्दळीच्या रस्त्यांवर स्टंटबाजी करून इतरांच्या जिवाला धोका निर्माण करतात. अशा वाहनधारकांवर वेळीच कडक कारवाईची जुळ्या शहरांतील नागरिकांची मागणी आहे. अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरांत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.बेशिस्त वाहनधारकांमुळे शहरात गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते. जागा मिळेल तिथे केलेले वाहनांचे पार्किंग आणि फेरीवाले, दुकानांच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर प्रचंड कोंडी होते. यातच हुल्लडबाज, स्टंटबाज वाहनधारकांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्कील होते. शाळा, कॉलेजला सुट्या लागल्याने दुचाकी शब्दश: उडवणाºया तरुणांची संख्या वाढली आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वर्दळीच्या रस्त्यांवर तरुणांची टोळकी दुचाकी घेऊन बाहेर पडतात. परतवाड्यातील तिलक चौक, बस स्टँड चौक, जयस्तंभ चौक आदी ठिकाणी हे जीवघेणे स्टंट सुरू असतात. अनेकदा दुचाकींच्या सायलेंसर काढून कर्कश्श आवाज केला जातो. समोरून येणाºया वाहनांना कट मारून पुढे जाणे, पाठीमागून अचानक आरडाओरडा करणे, ट्रिपल सीट, कर्कश्श हॉर्न असे प्रकार नेहमीच सुरू असतात.शहर पोलिसांनी वर्षभरात हुल्लडबाज वाहनधारकांविरोधात विशेष मोहीम राबवली. शाळा-कॉलेजवयीन मुलांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. पालकांचेही प्रबोधन केले. आता आचारसंहिता व शाळा, कॉलेजच्या सुट्यांमुळे रिकाम्या तरुणांकडून मौजमजेच्या नावाखाली बेदरकारपणे गाड्या उडवणे सुरू आहे.परतवाडा बस स्थानक, जयस्तंभ चौक, गुजरी बाजार, नगर मार्केट चौक, चिखलदरा स्टॉप, बैतुल व अंजनगाव स्टॉप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. दुसरीकडे लाल पूल, वाघा माता चौक या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आॅटोरिक्षा उभे राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. दुचाकीस्वारांसह काही कारचालक आणि एसटी चालकही स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे जाणे, सिग्नलवर शॉर्टकट मारणे, वनवेतून विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंगमध्येच वाहन पार्क करणे, धोकादायक ओव्हरटेक असे प्रकार अनेकदा सुरू असतात. पोलिसांनी पुन्हा बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारून रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.कारवाया होऊनही सुधारणा नाहीवाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याचे मत पोलीस अधिकाºयांनी व्यक्त केले. गतीच्या वेडापायी अनेक तरुण भरधाव वाहने चालवतात. याचा फटका सामान्य नागरिक आणि इतर वाहनधारकांना बसतो. रस्त्याने चालणेही अवघड बनले आहे. सुट्टीच्या काळात पोलिसांनी विशेष दक्षता घेऊन बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.आॅटोरिक्षा, ट्रॅव्हल्स सुसाटयेथील बस आगारातून सर्रास प्रवासी पळविले जातात. आॅटोरिक्षा व अन्य खासगी वाहने बस आगाराच्या २०० मीटर अंतरावर असावित, असा दंडक आहे. मात्र, तो केव्हाही पाळला जात नाही वा त्याचा आग्रहदेखील संबंधित यंत्रणा धरत नाही. आॅटोरिक्षाचालक तर थेट आगारातून जाऊन प्रवाशांची ने-आण करतात. वाहतूक पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.नव्याने सुरु झाली वाहतूक शाखादोन वर्षांपासून बंद असलेली वाहतूक शाखा गत काही महिन्यांपूर्वी नव्याने सुरू झाली. १५ दिवसांपूर्वीच येथे काही पोलीस कर्मचारी व एका अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. ठाणेदार म्हणून काम पाहिलेल्या पोलीस अधिकाºयाकडे परतवाडा शहरातील वाहतूक नियंत्रित करुन अतिक्रमणावर आवर घालण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे.बस स्थानक परिसरात ट्रॅव्हल्स चालकांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जयस्तंभ चौक, गुजरी बाजार, चिखलदरा स्टॉप आदी ठिकाणी प्रत्येकी दोन कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. बेशिस्त वाहतूक खपवून घेतली जाणार नाही.- नागेश चतरकरसहायक पोलीस निरीक्षकवाहतूक शाखा, परतवाडा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी