शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

११०० किलोमिटरहून डीबीने आणला सराफाला लुटणारा मुख्य आरोपी

By प्रदीप भाकरे | Published: September 14, 2024 5:59 PM

अटक आरोपींची संख्या सहावर : गाडगेनगर पोलिसांचे यश, पिस्टलच्या धाकावर लुटल्याचे प्रकरण

अमरावती: येथील सुवर्णकार अरविंद जावरे यांच्याकडील चांदीची १५ किलोची बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या लुटारूंच्या म्होरक्याला अटक करण्यात गाडगेनगर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आले. धनंजय योगेंद्रसिंग यादव (२५, रा. बजानखाना अंतु, जि. प्रतापगड उत्तर प्रदेश) याला शुक्रवारी उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली. गाडगेनगर पोलीस त्याला घेऊन शनिवारी अमरावतीत परतले.

           

यापुर्वी याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. धनंजय योगेंद्रसिंग यादव हा लूट प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेखा कॉलनी येथील अरविंद उत्तमराव जावरे (५५, जवाहरनगर) हे ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास वडिलांसोबत मोपेडने आपल्या ज्वेलरी शॉपकडे जात होते. दरम्यान शितला माता मंदिर जवाहरनगर येथे चार ते पाच इसमांनी त्यांना अडविले. आरोपींनी मोपेडच्या पायदानवरील चांदीचे आर्टिकल असलेली १५ किलो वजनाची बॅग जबरदस्तीने हिसकावली. जावरे यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना पिस्टल दाखविली. मारहाण देखील केली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. 

आरोपी प्रतापगढी व दर्यापूर, अमरावतीचेयाप्रकरणी, गुन्हे शाखा युनिट एकने यापुर्वी नागपुर येथून आरोपी ग्यासुद्दिन वहाजोद्दीन कुरेशी, मोहम्मद सादिक खान हारुन खान, प्रेम उर्फ प्रेमदास महादेवराव नितनवरे, विनोद शंकरराव गिरे व संजय बाबुलाल बिनकर यांना अटक केली आहे. या गुन्हयातील इतर आरोपी हे उत्तरप्रदेशात पळून गेल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रतापगढ येथे गेले होते. तेथून शुक्रवारी सायंकाळी आरोपी धनंजय यादव याला ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगरचे ठाणेदार प्रशांत माने यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख तथा सहायक पोलीस निरिक्षक मनोज मानकर, उपनिरिक्षक संजय डाखोरे, अंमलदार भारत वानखडे, संजय इंगळे, गुलरेज खान, नंदकिशोर करोची, महेश शर्मा, जयसेन वानखडे, नितीन कांबळी, सागर भोजने यांनी ही कारवाई केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी