आंदोलन : विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेधले लक्षअमरावती : अपंग जनता दलाच्यावतीने शासन व प्रशासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्थानिक चौकातून विभागीय आयुक्त कार्यलयावर अपंगानी धडक मोर्चा बुधवारी काढला. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलनकर्त्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये अपंगांसाठीच्या शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अपंगांचे बीज भांडवल योजनेचे कर्ज त्वरित माफ करावे, अपंग कल्याण व पुर्नवसनाचा तीन टक्के निधी त्वरीत खर्च करण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अपंग तक्र ार निवारण समिती स्थापन करावी, विशेष अपंग अनुशेष भरती सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अपंग जनता दलाचे अध्यक्ष शेख अनिस यांच्या नेतृत्वात आयुक्त राजुरकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांवर २६ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी करावी, अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात राजिक शहा, सुधाकर काळे, संजय पंडित, कमलेश गुप्ता, ज्योती देवकर, नामदेव डोंगरदिवे यांचा समावेश होता.(प्रतिनिधी़)
अपंग जनता दलाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: January 14, 2016 12:10 AM