लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढविण्यात आलेला आहे. आता १७ मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत शहरात बाजार समितीचे फळ व भाजीपाला यार्ड, सायन्सकोअर, दसरा मैदान येथील भाजीपाला विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी रविवारी जारी केले आहेत.शहरासह जिल्ह्यात ४ ते १७ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना सकाळी ८ ते दुपारी १२ या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता संचारबंदीत शिथिलता आहे.लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे मुख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. ६५ वर्षांवरील वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षांआतील मुले यांनी आवश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारचे कटींग, सलून, स्पा आदी सर्व दुकाने या कालावधीत बंद राहतील. शासकीय, खासगी व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. याबाबतची जबाबदारीही संबंधित कार्यालय प्रमुखांची राहील व या कार्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.उल्लंघन केल्यास शिक्षापात्र गुन्हाया संचारबंदीच्या काळात शहर किंवा ग्रामीणमधील कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचा भंग केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षा पात्र अपराध केल्याचे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पीएसआय दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाºयास जिल्हाधिकाºयांनी प्राधिकृत केले आहे.
शहरातील भाजी,फळ बाजार १७ पर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 5:00 AM
लॉकडाऊनच्या काळात एखाद्या ठिकाणी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोन जाहीर झाल्याचे घोषित होण्यापूर्वी ज्या सर्व सवलती व सूट होत्या त्या रद्द झाल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व महापालिकेचे आयुक्त तसेच नगरपरिषदांचे ख्याधिकाऱ्यांनी क्लस्टर किंवा कंटेंनमेंट झोनमधील क्षेत्रात निवासी असणाऱ्या नागरिकांना आरोग्य सेतू अॅपद्वारे १०० टक्के संरक्षण प्राप्त होईल यासाठीचे प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शहर, जिल्हा सीमेवर वाहनांना प्रतिबंधाचे आदेश