शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

२९ कोटींचा निधी मंजूर छदामही मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:07 AM

जिल्ह्यात पाणीटंचाईसंंबंधी २९ कोटी ४८ लाखांचा आराखडा मंजूर केल्यानंतर सात महिन्यांत शासनाकडून छदामही मिळाला नसल्याची धक्कादायक बाब काँग्रेसच्या दुष्काळ दौरा समितीने गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. गतवर्षीच्याच तीन कोटी रुपयांच्या निधीतून पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा आराखडा : काँग्रेसच्या दुष्काळ दौरा समितीच्या आढावा बैठकीत प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात पाणीटंचाईसंंबंधी २९ कोटी ४८ लाखांचा आराखडा मंजूर केल्यानंतर सात महिन्यांत शासनाकडून छदामही मिळाला नसल्याची धक्कादायक बाब काँग्रेसच्या दुष्काळ दौरा समितीने गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाली. गतवर्षीच्याच तीन कोटी रुपयांच्या निधीतून पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यात येत आहे.काँग्रेसच्या ११ आमदारांच्या दुष्काळ दौरा समितीने १६ मे रोजी अमरावती गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ व पाणीटंचाई आराखड्याविषयी बैठक घेतली. अपर जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व अन्य अधिकाऱ्यांनी समितीच्या पुढ्यात उपाययोजनांची माहिती ठेवली. तथापि, जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. शासनाने पाच तालुके व महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पैसाच नसल्याने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, असा आरोप समितीने केला.यावेळी माजी मंत्री वसंत पुरके, आ. राहुल बोद्रे , आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, आ. नातीकोद्दीन खतीब, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे आदींनी दुष्काळ, पाणीटंचाई, रोजगार, चारा डेपो, शेतकरी कर्जमाफी, टँकरने पाणीपुरवठा, तलावातील गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण, अप्पर वर्धातील गाळ काढणे आदी विषयांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला नाही. खरीप हंगामासाठी १६८५ कोटींचे उद्दिष्ट असताना, आतापर्यंत ११० कोटींचे वाटप झाले. यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल १०२ कोटींचे वाटप केले. कर्जवाटपात मागे असलेल्या अन्य बँकांवर कारवाई करा, अशी मागणी वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, हरिभाऊ मोहोड यांनी केली.नगरपंचायत अध्यक्षांकडून राजकारणधामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रात आमदार निधीतून चार हातपंप मंजूर झाले. मात्र, स्थानिक नगरपंचायत अध्यक्ष नाहरकत प्रमाणपत्र देत नाही तसेच विशेष सभाही घेत नाहीत. सत्तापक्षाने दुष्काळ आणि पाणीटंचाईची कामे केली नाहीत. आपले अपयश लपविण्यासाठी ते असे करीत असल्याचा मुद्दा आ. वीरेंद्र जगताप यांनी मांडला.वॉर रूम सुरू करादुष्काळाशी दोन हात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने वॉर रूम सुरू करावी, अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करा. समितीने मांडलेले मुद्दे, प्रश्नांचा आढावा घेतला जाईल.दर सोमवार व शुक्रवारी दुष्काळी परिस्थिती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाला जाब विचारला जाईल, असे आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.जिल्हाधिकाºयांसोबत चर्चेअंती निर्णय घेणारआढावा बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल हजर नव्हते. त्यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी संजय पवार व सीईओ मनीषा खत्री यांनी धुरा सांभाळली. समितीच्या मुद्द्यावर जिल्हाधिकाºयांशी चर्चेनंतर निर्णय घेऊ, असे उत्तर दिले.पश्चिम महाराष्ट्रात चारा छावण्या; विदर्भात दुष्काळ नाही का?पश्चिम महाराष्ट्रात बारमाही सिंचन, पशुधनासाठी चारा, ऊसाचे उत्पादन आहे. तेथेच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. विदर्भ दुष्काळात होरपळत असताना एकही चारा डेपो सुरू केला नाही, याकडे काँग्रेस नेत्यांनी लक्ष वेधले.शोकात्म कविताराज्य शासनाने राबविलेल्या ‘गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार’ योजनेचा काहीच फायदा झाला नाही. ही शोकात्म कविता ठरत असल्याची टीका वसंत पुरके यांनी केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईcongressकाँग्रेस