आॅनलाईन लोकमतपरतवाडा : येथील पंचबोल पॉइंटच्या सातशे फूट खोल दरीत सोमवारी कोसळून मृत्यू पावलेल्या दोन्ही युवकांवर शोकाकुल वातावरणात खराळा या त्यांच्या गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने या घटनेच्या अनुषंगाने सुचित केले आहे.पंचबोल पॉइंटवर फिरण्यासाठी आलेले खराळा येथील नयन ढोक व वैभव पावडे हे युवक पाय घसरल्याने दरीत कोसळले होते. यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसºयाला उपचारार्थ अचलपूर येथे नेत असताना वाटेत मृत्यू झाला. दोघांच्या मृतदेहाचे चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालय व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी दोघांवर खराळा या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखलदºयाचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी घटनेच्या वेळी उपस्थित सहकारी मित्रांचे बयाण नोंदविले. माकडाने जॅकेट पटविल्याने सदर अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.पर्यटकांनी संयम बाळगण्याचे आवाहनविदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांना दरीच्या काठावर जाण्यास मनाई असताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहे. तीन महिन्यांपूर्वी पंचबोल पॉइंटवरून एक युवक दरीत कोसळून गंभीर जखमी झाला होता. येथील पॉइंटवरील कठडे ओलांडून स्टंटबाजी वा दरीत खोलवर पाहण्याच्या मोहात पडू नये. सुरक्षा कठडे पर्यटकांसाठीच लावण्यात आले आहेत. तेव्हा या सीमेचे पालन करण्याचे आवाहन नगरपालिका व तहसील प्रशासनाने केले आहे.
शोकाकुल वातावरणात दोन्ही युवकांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:28 AM
आॅनलाईन लोकमतपरतवाडा : येथील पंचबोल पॉइंटच्या सातशे फूट खोल दरीत सोमवारी कोसळून मृत्यू पावलेल्या दोन्ही युवकांवर शोकाकुल वातावरणात खराळा या त्यांच्या गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने या घटनेच्या अनुषंगाने सुचित केले आहे.पंचबोल पॉइंटवर फिरण्यासाठी आलेले खराळा येथील नयन ...
ठळक मुद्देपोलिसांनी केला मर्ग दाखल; प्रशासनाने केले अलर्टपंचबोल प्रकरण