शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
2
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
3
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
4
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
5
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
6
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
7
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
8
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
9
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
10
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
12
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
13
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
14
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
15
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
16
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
17
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
18
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
19
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
20
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

‘जीएडी’ अधीक्षकांच्या बदलीचा आयुक्तांना विसर

By admin | Published: November 07, 2016 12:18 AM

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालय अधीक्षकांविरुद्ध असंतोष उफाळला असताना ...

महिनाभरानंतरही परिस्थिती जैसे थे : कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालय अधीक्षकांविरुद्ध असंतोषअमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालय अधीक्षकांविरुद्ध असंतोष उफाळला असताना आयुक्तांना मात्र, त्यांच्या बदलीचा विसर पडला की काय? अशी शंका कर्मचाऱ्यांकडून उपस्थित झाली आहे. जीएडीच्या विद्यमान कार्यालय अधीक्षकांविरुद्ध तक्रारीचा खच असतानाही आयुक्त त्यांच्याबाबत मवाळ का? असा प्रश्न उपस्थित होत असताना कामाच्या धबगड्यात आयुक्त विसरले असतील, अशी शक्यता कर्मचारी उपस्थित करीत आहेत. एखाद्या निलंबित कर्मचाऱ्याला पुन्हा स्थापित करण्यासाठी आयुक्त दोन ते तीन महिन्याचा मोठा कालावधी घेत असतील, तर आधीच निलंबनाचा बक्कळ पुर्वानुभव आणि आपल्याच सहकारी आणि वरिष्ठांविरोधात ठाण्याच्या पायरी चढणाऱ्याला महत्त्वपूर्ण पद कसे दिले जाते, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जीएडी अधीक्षकांची वास्तवकता लक्षात आणून दिल्यानंतर आयुक्तांनी त्या चौकशीची जबाबदारी उपायुक्त विनायक औगडांूकडे सोपविली होती. मात्र, महिन्याभरानंतरही संबंधिताला जीवनदान मिळाल्याने महत्वपूर्ण पदावर आयुक्तांना निलंबित आणि कायदेभंग करणार कर्मचारी चालतो, असा अर्थ काढल्यास वावगे ठरू नये. ४ आॅक्टोबरला जीएडीच्या अधीक्षक पदावर तात्पुरती नियुक्ती देताना १९ च्या एसटी कमिटीच्या दौऱ्याचा संदर्भ देण्यात आला होता. मात्र, दौरा रद्द झाल्यानंतर हा पंधरवाडा उलटून गेला. १९ नंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त हेमंत पवार यांनी दिली होती. गुण वाढवण्याच्या आरोपाखाली फौजदारीला फाटा देत केवळ निलंबनाची कारवाई करून यापुढे एक्झीक्यूटीव्ह पद देण्यात येवू नये, असा शेरा असणारी फाईल दडपविल्याची चर्चा आहे. ती त्यांच्यासाक्ष ठेवण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे आपण ज्या कर्मचाऱ्याची आपण ज्या कर्मचाऱ्याची रदबदली करतो आहे, त्याला निलंबनाचा दीर्घानुभव असल्याबाबत उपायुक्तही अनभिज्ञ होते, ही पार्श्वभूमी लक्षात घेता जीएडी अधीक्षक पदाबाबत आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियुक्तीत अर्थकारणजीएडीचे अधीक्षकपद लाभाचे पद म्हणून ओळखल्या जाते. आस्थापना आणि प्रशासकीय कारवाई सोबतच सर्व्हिसबुक आणि पगारपत्रकांची मुख्य जबाबदारीही जीएडीवर आहे. त्यामुळे या पदाचे वेगळे वेतन मिळत नसतानाही अनेक जण या पदाकडे आशाळभूत नजरेने पाहतात. त्यामुळे जीएडी अधीक्षकाच्या नियुक्तीमध्ये अर्थकारण झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून होत आहे.पारदर्शकतेवर प्रश्नचिन्हआयुक्त हेमंत पवार यांनी पारदर्शक आणि सकारात्मक अशी ओळख जपली आहे. मात्र, जीएडी अधीक्षकांबाबत त्यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कुणाचे निलंबन असो की, वेतनवाढ रोकने असो, कायद्याच्या चौकटीत बसूनच आयुक्त काम करतात, अशी त्यांची कार्यप्रणाली आहे. मात्र जीएडी अधीक्षकाबाबत त्यांनी धारण केलेले मौन त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे.