शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

इयर एन्डिंगला १९ गुन्ह्याचे ‘डिटेक्शन’; दहा आरोपींना अटक, ४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By प्रदीप भाकरे | Published: January 10, 2023 6:31 PM

गाडगेनगर पोलिसांचे यश

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी सन २०२२ च्या डिसेंबर महिन्यात तब्बल १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील व ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात ‘टीम गाडगेनगर’ने हे यश प्राप्त केले.

ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील व सहाय्यक आयुक्त पूनम पाटील यांनी गुन्हे शोध पथकाची विशेष बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने डिसेंबर २०२२ या एक महिन्यात ठाण्यात दाखल १९ गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये जबरी चोरीचे २, घरफोडी ८ गुन्हे, दुचाकी चोरी २, चारचाकी चोरी २, मंदिरातील चोरीचे २ व अन्य चोरीच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे.

या गुन्ह्यांत अमनदीपसिंह अजितसिंह संधू (रा. चौका साहिल, पंजाब), संतोष मधुकर भालेराव (रा. रमाबाई आंबेडकरनगर), उमेश अवधुत खंडारे (रा. रमाबाई आंबेडकर नगर), मुक्ता आकाश धर्माळे (रा. वृंदावन कॉलनी), मोहीत उर्फ सुदर्शन सतीश राऊत (रा. व्यंकटेश टाऊनशीप, भातकुली मार्ग, अमरावती), आकाश साहेबराव वानखडे (रा. विलासनगर), अजय ज्ञानेश्वर इंगळे (रा. भीमनगर), संदेश प्रभूदास नवरे (रा. बेलपुरा), सागर संतोष काकणे (रा. विलासनगर), विजय सूर्यभान कीर्तक (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व सर्वेश जानराव भुते (रा. पेन्शनपुरा, परतवाडा) यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, अंमलदार ईशय खांडे, निळकंठ गवई, अनिल तायवाडे, गजानन बरडे, गणेश तंवर, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, परवेज, समीर, उमेश भोपते, राज देविकर, जयसेन वानखडे, प्रकाश किल्लेकर, सागर धरमकर, सुशांत प्रधान, संग्राम भोजने, पंकज गाडे, मनीष नशीबकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती