आॅनलाईन लोकमतअमरावती : शीतल पाटील हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिला विहिरीत फेकल्याची कबुली अखेर सुनील गजभियेने पोलिसांना दिली. बुधवारी न्यायालयाने सुनील गजभियेला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉडसुद्धा बुधवारी जप्त केला आहे.आक्रमण संघटनेत सक्रिय व सामाजिक क्षेत्रात महिलांच्या उद्घारासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शीतल पाटीलचा खून उघड झाल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली. आक्रमण संघटनेचा प्रमुख सुनील गजभियेनेच त्याच्या सहकार्याने शीतल पाटीलची हत्या केल्याचे रहमानच्या बयाणावरून स्पष्ट झाले. गजभिये पोलिसांची दिशाभूल करीत शीतलने आत्महत्या केल्याचा आव आणत होता. मात्र, पोलीस कोठडीत पोलिसी खाक्याचा हिसका बसताच गजभियेने तिच्या हत्येची कबुली दिली.सुनील श्यामराव गजभिये (रा. रविनगर) व शिवदास गोंडाणे (गडचिरोली) या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासकार्यासाठी गाडगेनगर पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर गजभियेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे, तर गोंडाणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.रहाटगाव रिंगरोडलगत फेकला होता रॉडसुनील गजभिये, शीतल व रहमान कारने चांदूरबाजारहून अमरावतीला येत होते. यादरम्यान सुनील गजभियेने शीतलच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून हत्या केली आणि त्यानंतर रहाटगाव रिंगरोडवर तो रॉड फेकून दिला. शीतलचा मृतदेह एक्स्प्रेस हायवेवरील जुन्या टोल नाक्याजवळील विहिरीत त्यांनी फेकला. त्यानंतर सुनील व रहमान हे दोघेही आपआपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी एक्स्प्रेस हायवेवरील जंगल भागात लोखंडी रॉड फेकून दिला. तो रॉड पोलिसांनी बुधवारी जप्त केला.मोबाईलचा थांगपत्ता नाहीशीतल पाटीलला मोबाईल आरोपींनी विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला. मात्र, विहिरीत पाणी अधिक असल्यामुळे तळ गाठणे शक्य नसल्याचे दिसून आले. शीतल पाटीलचा मोबाइल बाहेर काढण्याचे आव्हान पोलिसासमोर आहे.शीतल पाटील हत्याकांडात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील गजभियेच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ मिळाली असून, शिवदास गोंडाणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षकगाडगेनगर ठाणे.