नवाथे येथील घटना : महापालिकेची कारवाईअमरावती : बडनेरा मार्गावर नवाथे स्थित नाल्याच्या काठावर असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाची अतिक्रमित भिंत व पायऱ्या तोडण्यात आल्या. अचानक महापालिकेचा गजराज चालल्याने ते बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.नवाथे येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत परिसरातील नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी किशोर बोरकर यांनी हे दुकान हद्दपार करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लावून धरली आहे. नवाथे येथील देशी दारु विक्रीचे दुकान निकषात बसत नाही. शाळेच्या प्रवेशव्दारापासून ४५ मीटर अंतरावर आहे. नियमानुसार ५० मीटर अंतरावर असावे. त्यामुळे हे दुकान हद्दपार करावे.- किशोर बोरकर, कॉंग्रेस पदाधिकारी
देशी दारू विक्रीच्या दुकानावर चालला गजराज
By admin | Published: April 07, 2015 12:32 AM