श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शुक्रवारी विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळे शहर आतुरतेने गणरायाची प्रतीक्षा करीत असले तरी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मात्र, वाहनांतून बाप्पाची मूर्ती आणताना खड्डे चुकविण्याची जी कसरत करावी लागेल, त्याची काळजी लागून राहिली आहे. वाहनांमध्ये ठेचकाळणारी विघ्नहर्त्याची मूर्ती निर्विघ्नपणे मांडवापर्यंत कशी पोहोचवायची, याचे नियोेजन मंडळाचे कार्यकर्ते करीत आहेत.दुसरीकडे प्रशासन मात्र निद्रिस्त असून चाळणी झालेल्या रस्त्यांची साधी डागडुजी करण्याची तसदीही घेतलेली दिसत नाही.अमरावती शहरात अनेक प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती येथे तयार होतात आणि आधीच बुकिंग करून त्या शहराच्या आसपासच्या भागातील गणेश मंडळे नेतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सजविलेल्या वाहनांमधून वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक काढली जाते.प्रशासनाला केव्हा येणार जाग ?ाावेळी कायदा आणि सुरक्षा कायम राखण्यासोबतच सुरक्षेसाठी आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पेलावी लागते. यंदा मात्र, या जबाबदाºयांमध्ये आणखी एका जबाबदारीची भर पडली आहे. ती म्हणजे रस्त्यांवरील खड्ड्यांमधून हेलकावणाºया वाहनातून ठेचकाळणारी बाप्पाची मूर्ती सावरत सुरक्षितपणे मंडळाच्या मांडवापर्यंत नेण्याची.बडनेराला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते पाहता अशा खड्डेमय रस्त्यांमधून विघ्नहर्त्याचे आगमन होणार, हा विचार करून कसेसेच होते. जुना बायपास मार्गाने मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींची वाहनांमधून इतरत्र वाहतूक केली जाते. गोपालनगर, सातुर्णा परिसरात मूर्तिकारांचे गोदाम आहेत. साईनगर मार्गे देखील विविध मंडळांचे कार्यकर्ते आपापल्या वाहनांमधून मोठ्या श्रद्धेने गणेशमूर्ती नेतात. मात्र, बडनेरानजीक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यावरून वाहने चालविताना प्रचंड कसरत करावी लागते.-तर पोलीस प्रशासन काय करणार ?गणेशोत्सवापूर्वी पोलीस ठाणेनिहाय विविध मंडळांच्या बैठकी घेऊन पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना मूर्तींची दक्षता कशी घ्यावी, याबाबत सूचना दिल्यात. यात दिरंगाई झाल्यास गुन्हे नोंदविण्याचा इशारा दिला. मात्र, खराब रस्त्यांमुळे मूर्तीची विटंबना झाल्यास पोलीस प्रशासन संबंधित विभागांवर गुन्हे नोंदविणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.बडनेरा एसटी स्थानकासमोर खड्डेबडनेºयातही अनेक गणेश मंडळे आहेत. मात्र, यंदा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत सजग रहावे लागणार आहे. स्थानिक बसस्थानकासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. लोणी गावानजीक महामार्गाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांनी त्यांच्या अख्त्यारीतील रस्त्यांची साधी डागडुजी करण्याची तसदीही घेतलेली नाही. रस्त्यांची तात्पुरती डागडुजी तरी व्हायला हवी होती.
यंदाही खड्डे चुकवितच गणरायाचे आगमन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:40 PM
शुक्रवारी विघ्नहर्ता बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळे शहर आतुरतेने गणरायाची प्रतीक्षा करीत असले तरी .....
ठळक मुद्देरस्त्यांची चाळणी : ठेचकाळणाºया ‘बाप्पा’च्या सुरक्षेसाठी होणार कसरत