शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Ganesh Chaturthi 2018; बंदोबस्तात पोलीसदादांच्या घरचा गणपती हरवला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:29 AM

प्रत्येक नागरिक गणेशोत्सवाचा आनंद घेत असला तरी स्वत:च्या घरातील गणेशाच्या आरतीचे भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांंनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

ठळक मुद्देकर्तव्यास प्राधान्यरस्त्यावर बजावावी लागते सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हं, वारा, पाऊस यासह कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देताना त्यांच्या वेदना कोणी जाणून घेत नाही. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, स्वास्थ्य बिघडले असेल तरी सांगायचे कुणाला, अशा गंभीर अवस्थेत ऐन गणेशोत्सवात रस्त्यावर २४ तास पोलीस विभाग दक्षतेने कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यामुळेच प्रत्येक नागरिक गणेशोत्सवाचा आनंद घेत असला तरी स्वत:च्या घरातील गणेशाच्या आरतीचे भाग्य मिळत नसल्याची खंत अनेक पोलिसांंनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. घराघरांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे. या गदारोळात पोलिसांचा गणपती मात्र हरवला आहे. आपल्या घरातील गणेशाची स्थापना, आरती किंवा विसर्जनाचे भाग्य त्यांच्यापैकी अनेकांना लाभत नाही. सण, उत्सव ही संकल्पनाच पोलिसांच्या जीवनातून कालबाह्य झाली आहे. गणेशोत्सवच नव्हे नवरात्री, दिवाळी, ईद, नाताळ, नववर्ष, संक्रांतीलाही घराकडे जाता येत नाही. बंदोबस्तात सर्वाधिक कसरत करावी लागते ती मन:स्वास्थ्य सांभाळण्याची. आंघोळ नाही, नाश्ता-जेवणाचा तर पत्ताच नाही; त्यांच्या दु:खाची कुणाला पर्वाच नसल्याचे वास्तव आहे. गणेशोत्सवात जिल्ह्यात १५०० पुरुष, व ५०० महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा कार्यक्रमात कर्तव्यावर असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना तो करता येत नाही. खीर, मोदक बनविण्याचे भाग्यही अनेकींना मिळत नाही. वर्षभर अंगावर खाकी असते. सणांमध्ये साडी घालण्याची हौसही बंदोबस्ताला हजर असल्याने त्यांना पूर्ण करता येत नाही.होमगार्डही सेवेलापोलिसांच्या मदतीला रस्त्यावर सुमारे ६०० होमगार्ड उतरले आहेत. त्यामध्ये १०० महिलांचा समावेश आहे. त्यांनाही २४ तास ड्युटी असल्याने घरी वेळ देता येत नाही. पोलीस आणि होमगार्ड यांचीही अवस्था एकच आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८