लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगामी गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गणेशमूर्ती स्थापनेसंबंधी पोलीस ठाणेनिहाय बैठकी सुरू आहेत. या बैठकीत विविध सूचनांच्या अनुंषगाने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा आठ फूट निश्चित करण्यात आली असून, ती मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची नसावी, अशी सक्त सूचना गणेश मंडळांना देण्यात आली आहे.१३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, महिन्याभरापूर्वी अमरावतीकर तयारीला लागले आहेत. दरवर्षीच अमरावती शहरात गणेश स्थापनेचा उत्साह असतो. यंदाही तोच उत्साह कायम राहण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, महापालिका, बीअँडसी अधिकाऱ्यांकडून गणेश मंडळांना सूचना देण्यात येत आहेत. त्यामध्ये पोलीस विभागाने गणेश स्थापनेच्या मंडपासंदर्भात काही अटींचे पालन करण्याच्या सूचना मंडळांना दिल्या आहेत.ध्वनिप्रदूषणावर मर्यादागणेश स्थापना व विसर्जन कार्यक्रमात विनापरवाना वाद्य वाजविता येणार नाही. डीजे साऊंड वाजवू नये तसेच स्पिकरची भिंत लावू नये. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर बंद ठेवावे. हवेत गुलाल फेकू नये, धार्र्मिक भावना दुखेल असे कृत्य करू नये. ध्वनिमर्यादा पाळावी. शांतता झोनमध्ये ५० डेसिबल, निवासी झोनमध्ये ५५ डेसिबल, वाणिज्य झोनमध्ये ६५ डेसिबल व औद्योगिक झोनमध्ये ७५ डेसिबलची मर्यादा आहे.अटीचे उल्लंघन केल्यास कारवाईगणेश मंडळांकडून अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा १९८६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबधीत व्यक्तीस पाच वर्षे तुरुगांवास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे. मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.अशा आहेत अटीलहान रोडवर मंडप येत असल्यास २५ टक्के जागा घेता येईल.रहदारीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.उत्सव संपल्यानंतर मंडप काढून जागा पूर्ववत करा.जागेवर स्थायी बांधकाम करता येणार नाही.स्वागत द्वार, झिलेटिन मंडपाची उंची १५ फुटांपेक्षा कमी नसावी.मंडपाचे बांधकाम जबाबदार व्यक्तीकडूनच करून घ्यावे.इलेक्ट्रीक वाहिनीखाली मंडप घेऊ नये. महावितरणकडून तपासणी करून घ्यावी.मंडपात रात्री चार स्वयंसेवक व दिवसा दोन नियमित ठेवावे.मिरवणुकीतील वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक.मूर्ती प्लास्टर आॅफ परिसची नसावी. उंची आठ फुटांपेक्षा अधिक नसावी.स्वयंसेवक टाइमपास म्हणून जुगार खेळणार नाहीत.
आठ फुटांपेक्षा मोठी नसावी गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:07 PM
आगामी गणोशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, गणेशमूर्ती स्थापनेसंबंधी पोलीस ठाणेनिहाय बैठकी सुरू आहेत. या बैठकीत विविध सूचनांच्या अनुंषगाने गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादा आठ फूट निश्चित करण्यात आली असून, ती मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसची नसावी, अशी सक्त सूचना गणेश मंडळांना देण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्लास्टर आॅफ पॅरिसवर निर्बंध : गणेश मंडळांना सूचना