फोटो - गणेश २५ पी
बेलोरा-चांदूर बाजार : संवेदनशील गणल्या जाणाऱ्या तालुक्यातील बेलोरा येथे यंदा पोलीस बंदोबस्ताविना गणेश विसर्जन पार पडले. गणेश मंडळांनी सामाजिक भान ठेवून शांततेत पार पाडलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन पोलीस प्रशासन व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचा सत्कार केला.
बेलोरा ग्रामपंचायत व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या गणेश मंडळांतील कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे, मंगेश देशमुख, सरपंच दीपाली गोंडीकर, उपसरपंच सुप्रिया उतखेडे, विलास भोजने, ठाणेदार सुनील किनगे, शिरजगाव कसबाचे ठाणेदार दीपक वळवी, ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार पंकज दाभाडे मंचकावर उपस्थित होते. बेलोरा येथील गणेशभक्तांचा आदर्श राज्यभरातील गावांनी घ्यावा, असे मंत्री बच्चू कडू म्हणाले. गावातील आठही गणेश मंडळांचे कार्यकर्ते व अध्यक्षांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ठाणेदार दीपक वळवी, तर संचालन व आभार प्रदर्शन गावंडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता सहायक पोलीस निरीक्षक अहिरकर व पेंदोर, बेलोरा बीट जमादार विनोद बोबडे, खुप्रिया प्रशांत भटकर, मंगेश मस्के, विनोद दाबणे, अरुण गोंडीकर, ग्रामविकास अधिकारी श्री भांडे आदींनी परिश्रम घेतले.