फोटो पी २७ नागपुरी गेट
अमरावती: इतवारा बाजार परिसरातील गोडाऊन फोडून त्यातुन लाखोंचा तांदूळ लांबविणारी टोळी नागपुरी गेट पोलिसांनी जेरबंद केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख २१हजार १०२ रुपयांचा तांदूळ जप्त करण्यात आला. ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
इतवारा बाजार स्थित गोडाउनचे दाराचे व गेटचा कुलुप कोंडा तोडून १ लाख २१ हजार १०२ रुपयांचे १०२ तांदुळाचे कट्टे अज्ञात चोराने चोरुन नेले, अशी तक्रार नागपुरी गेट पोलिसांत नोंदविण्यात आली होती. चोरी करणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळाल्याने आरोपी शेख कलीम(२२, रा. पठाण चौक), मोहम्मद रशीद मोहम्मद रफीक (२७, अकबरनगर), अब्दुल जाकीर उर्फ मोनु अब्दुल शकील (२०, पाटीपुरा), कलीम खान सलीम खान (२५, गवळीपुरा) व ईर्शाद खान शमशेर खान (३८, जमील काॅलनी) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी १५ ऑगस्ट रोजी त्या गोडाऊनमधून तांदूळ चोरल्याची व ते तांदुळ आरोपी इर्शादला विकल्याची कबुली दिली. इर्शादने तो साठा तारखेडा येथील गोडाउनमधून ठेवला होता. तो हस्तगत करण्यात आला. पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त लष्मण डुंबरे यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, हवालदार बबलु येवतीकर, प्रमोद गुडधे, कैलाश जाधव, अकील खान, विक्रम देशमुख, जुगल यादव, आबीद शेख यांनी ही कारवाई केली.