(फोटो आहे.)
अमरावती : अंजनगाव येथील महिलेच्या गळ्याील मंगळसूत्र तोडणारी टोळीच्या मुसक्या सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचीसुद्धा आरोपींनी कबुली दिली आहे. ही कारवाई सोमवारी अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आली.
सुनील मुन्ना घोटे (२२, रा. धोंडी गुदगाव, ता. भैसदही, जि. बैतुल), सुनील काळमा धुर्वे (२३, रा. दहेंद्री, ता. भैसदही) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी एका विधिसंघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगला सेवकराम खोपाले (२२) यांनी याप्रकरणी अंजनगाव ठाण्यात तक्रार नोंदविली होती. १ जुलै २०२१ रोजी त्या अंजनगाव ते बोराळा मार्गावर पायी जात असताना दुचाकीवरील आरोपींनी महिलेच्या गळ्यातील जबरीने १५ हजाराचे मंगळसूत्र हिसकवून नेले होते. विधिसंघर्षित बालकानेही अंजनगाव येथून दुचाकीचोरी तसेच लखाड, खिराळा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या अंगझडतीतून १६ हजाराचे सोन्याचे डोरले, ८,३४० नगदी, ५० हजाराची दुचाकी असा एकूण ७४ हजार ३४० रुपयांचा मुद्दमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, अंजनगाव सुर्जीचे पोलीस निरीक्षक राजेश राठोड, उपनिरीक्षक आशिष चौधरी, एएसआय संतोष मुदांने , रवींद्र बावने, पुरुषोत्तम यादव, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, नितेश तेलगोटे, एएसआय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांच्या पथकाने तसेच सायबर सेलच्या सहकार्याने करण्यात आली.