शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

'सरकार गँग'च्या १३ सदस्यांची सीपींसमोर पेशी

By admin | Published: March 22, 2017 12:06 AM

याद राखा पुन्हा दादागिरी केली तर, अशा शब्दांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी 'सरकार गँग'च्या १३ सदस्यांना ताकिद दिली.

पालकांचीही हजेरी : तर याद राखा, सीपींनी दिली ताकीदअमरावती : 'याद राखा पुन्हा दादागिरी केली तर, अशा शब्दांत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी 'सरकार गँग'च्या १३ सदस्यांना ताकिद दिली. रविनगरात दहशत पसरविणाऱ्या या गँगच्या सदस्यांची मंगळवारी पोलीस आयुक्तांसमोर पेशी करण्यात आली असून गँगमध्ये बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यातरूणांसोबत यांच्या पालकांनाही आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. रंगपंचमीच्या दिवशी रविनगरात रंग खेळणाऱ्या महिला-पुरूष व लहान मुलांमध्ये शिरून सरकार गँगच्या सदस्यांनी धुमाकूळ घातला होता. हा प्रकार लक्षात येताच येथील रहिवासी व आयजी कार्यालयात स्टेनो रायटर पदावर कार्यरत पोलीस कर्मचारी राजेश घुले यांनी सरकार गँगच्या सदस्यांना हटकले. मात्र, गँगमधील सदस्यांनी वाद करीत राजेश घुलेंवरच तलवारीने वार केला. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ऋषी रविंद्र उंबरकर (२१,रा.अंबाविहार), बाबू ऊर्फ आदित्य संजय नडे (२१, छांगाणीनगर) व महेश राजेश पळसकर (२०,रा. रविनगर) यातिघांना अटक केली तर दोन आरोपी अद्यापही पसारच आहेत. पालकांचीही कानउघाडणीअमरावती : याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सरकार गँगमधील सर्वच सदस्यांना ताब्यात घेण्याचे आदेश राजापेठ पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सरकार गँगच्या सदस्यांची शोध मोहीम राबवून मंगळवारी १३ सदस्यांना ताब्यात घेतले व त्यांची पोलीस आयुक्तांसमोर पेशी केली. यावेळी पोेलीस आयुक्तांनी गँगमधील १३ सदस्यांना तंबी दिली असून त्यांच्या पालकांचीही कानउघाडणी केली. याद राखा जर पुढे असे प्रकार घडले तर सोडणार नाही, कठोर कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत आयुक्तांनी त्या तरूणांना समज दिली. गँगचे सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थीसरकार गँगमधील उर्वरीत १३ सदस्य महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. हे तरूण साईनगर, रविनगर, पटवीपुरा, अंबागेट, चपराशीपुरा आदी भागातील रहिवासी असून ते विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र, हे सर्व विद्यार्थी सरकार गँगशी संबंधित असल्याचे पोलीस चौकशी दरम्यान उघड झाले आहे.