कोरोनामुळे अनेकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्तीकडून इतरांच्या अवास्तव मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. आवश्यक गरजांची पूर्तता करताना दमछाक होत आहे. यावरून अनेक कुटुंबात ताण-तणाव वाढू लागला आहे. ही संवादाची दरी तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत जगणे शिकले पाहिजे. अवास्तव गरजा थांबविल्या पाहिजेत. हे संकट तुमच्यावरच नाही, तर अख्ख्या जगावर असल्याने समदु:खात समाधानाने जगणे शिकले पाहिजे, असे मत मानसोपचारतज्ज्ञांचे आहे.
बॉक्स
मन हलके करणे हाच उपाय
आवडीनुसार छंद जोपासा. म्युझिक, वाचन, खेळाचे विविध प्रकार, व्यायाम यामुळे मनावरील ताण कमी होईल.
अवास्तव खर्च टाळा, कुटुंबातील सदस्यांना समजून घ्या, खर्चावर नियंत्रण आणा.
जसे आपल्या आनंद इतरांना सहभागी करतो, तसेच दु:खही इतरांना शेअर करा. जेणेकरून आपले मन हलके होईल.
अनेक समस्या लपवून न ठेवता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. समुपदेशन करा. यामुळे ताण हलका होण्यास मदत होईल.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
हे संकट अवघ्या जगावर ओढावलेले आहे. त्यामुळे आपल्यासारखीच इतरांचीही स्थिती झालेली आहे. त्यामुळे आहे त्यातच समाधान माना. सकारात्मक विचार करा. इतरांनाही सकारात्मक दृष्टीने बघितल्यास मनात राग, द्वेष राहत नाही. परिणामी ट्रेस वाढणार नाही.
- डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ज्ञ, इर्विन रुग्णालय
--
आर्थिक घडी विस्कटली की समस्या निर्माण होतात. त्यामुळे परिस्थितीसापेक्ष राहणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत ताण वाढून घरात कलह वाढू शकतो. त्या समस्या इतरांना शेअर केल्या पाहिजे. समुपदेशन केल्यास समस्या वाढण्याऐवजी कमी होण्यास मदत होते. त्याही उपर त्रासदायक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे राहील.
- श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ