शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

कचरा विल्हेवाट, स्वच्छतेसाठी ‘स्मार्ट श्रीमती स्पर्धा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 10:35 PM

घरातील सुका कचरा व ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यामध्ये महिलांचे योगदान असते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यधिकारी गीता वंजारी व नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांच्या पुढाकाराने १ आॅगस्टपासूून नगरपालिकेच्यावतीने शहरात ‘स्मार्ट श्रीमती’ ही अभिनव स्पर्धा सुरू केली. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या स्पर्ध$कांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदर्यापूर नगरपालिकेचा अभिनव उपक्रम : १ आॅगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : घरातील सुका कचरा व ओला कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि स्वच्छता राखण्यामध्ये महिलांचे योगदान असते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यधिकारी गीता वंजारी व नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे यांच्या पुढाकाराने १ आॅगस्टपासूून नगरपालिकेच्यावतीने शहरात ‘स्मार्ट श्रीमती’ ही अभिनव स्पर्धा सुरू केली. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या स्पर्ध$कांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.यासंदर्भात प्रसिद्धीसाठी पत्रकही काढण्यात आले असून, आपण स्मार्ट श्रीमती आहात का, आपण आपल्या घरातील कचºयांचे ओला व सुका असे वर्गीकरण करता का, आपल्याकडे येणाºया नगर परिषदेच्या घंटागडीत वर्गीकृत देता का, अशी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेबाबत माहिती मिळण्यासाठी नगरपालिकेने एक टोल फ्री क्रमांकसुद्धा जारी केला असून, स्वच्छता विभागाला टेलिफोन क्रमांक सदर पत्रकावर नमूद करण्यात आला आहे.मुख्याधिकारी गीता वंजारी या रुजू झाल्यापासून वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. नगरपालिकेत सकाळी दहाच्या ठोक्याला राष्ट्रगीतसुद्धा त्यांनीच सुरू केले आहे.कशी आहे स्पर्धा?स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत दर्यापूर शहराला संपूर्णपणे कचरामुक्त करण्याकरिता नगर परिषदमार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये जे नागरिक घरातील दैनंदिन निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून नगर परिषदेच्या घटांगाडीमध्ये देतील, त्यांना नगर परिषदेच्यावतीने दररोज कुपन देण्यात येणार आहे. १५ कूपन खंड न करता गोळा करतील, अशा व्यक्तींची नावे लकी ड्रॉमध्ये घेण्यात येणार आहेत. त्या लकी ड्रॉमधील लकी ठरलेल्या प्रतिविभाग एका महिलेला पालिकेच्या वतीने आकर्षक चांदीचे नाणे देण्यात येईल. या स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर बनण्यासाठी मदत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी केले.स्पर्धेच्या नियम व अटी‘स्मार्ट श्रीमती’ स्पर्धा ही १ आॅगस्टपासून सुरू झाली आहे. महिलांनी दररोज निघणारा दैनंदिन कचरा ओला व सुका असा वर्गीकरण करून दोन कचरा पेट्यांमध्ये गोळा करणे अनिवार्य आहे. महिलांनी दररोज वर्गीकरण करून गोळा केलेला कचरा वर्गीकृत घंटागाडीत टाकणे बंधनकारक आहे. घर व दुकानातून निघणारा कचरा जसे डायपर, सॅनेटरी पॅड आदी ओला व सुका कचऱ्याच्या व्यतिरिक्त गोळा करणे बंधनकारक राहणार आहे.घर व दुकानातील कचरा नगर परिषदेच्या घंटागाडीव्यतिरिक्त रस्त्यावर किंवा नालीमध्ये टाकू नये. तसे आढळल्यास दोषी आढळणाऱ्यावर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. नागरिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वर्गीकृत कचरा दिल्याबद्दल कुपन सांभाळून ठेवणे अनिवार्य राहणार आहे. वर्गीकृत कचरा दिल्याबद्दल १५ दिवसांचे कूपन नगर परिषद कर्मचाºयांकडे सोपवावे. अशाच व्यक्तींना लकी ड्रॉमध्ये समाविष्ट करण्यात येईल.सुका कचरा (अविघटनशील)अन्नपदार्थांचे बॉक्स, पिझ्झा बॉक्स, भेटवस्तू पॅकिंग, रिकामी दूध पाकिटे, तिकिटांचे कागद, कम्प्यूटरचे कागद, पेपर रद्दी, तुटलेली प्लास्टिक खेळणी, रिकाम्या औषधी बॉटल, अ‍ॅल्युमिनिअम फॉइल, तुटलेल्या वस्तू, काच, लोखंडी वस्तू आदी.ओला कचरा (विघटनशील)पालेभाज्या, फळांचे सालपट, अंड्याची टरफलं, चहा पावडर, कॉफी पावडर, उरलेले अन्न, सुकलेले फुले, बिया, नारळाची केरसुणी, जुने झाडू आदी वस्तू ओला कचरा म्हणून साठवायच्या आहेत.शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने हा अभिनव उपक्रम स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामध्ये स्मार्ट श्रीमतींना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. त्यांचे गावात फ्लेक्ससुद्धा लावण्यात येणार आहे.- गीता वंजारी, मुख्याधिकारी, दर्यापूर