ग्राहकांना दिलासा : सोमवारपासून सुरळीत वितरण अमरावती : गॅस सिलिंडरृ वितरणात अनियमितता असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी गॅस वितरकांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत भारत पेट्रोलियमचे झोनल डायरेक्टर आय.एस. राव यांनी सोमवार २० फेब्रवारीपासून ग्राहकांना े सिलिंडर सुरळीत मिळेल, अशी माहिती दिली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ‘गॅस सिलिंडरचा तुटवडा’ या आशयाखाली ‘लोकमत’ने गरूवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. भारत पेट्रोलियम कंपनीचे नागपूर झोनल डायरेक्टर राव तडकाफडकी शहरात पोहोचले. शहरातील गॅस सिलिंडर वितरकांची बैठक घेऊन वितरणामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. गॅस घेऊन येणारे टँकर नागपूर, जळगावात पोहोचले आहेत. सोमवारपासून परिस्थिती सुधारणार, अशी ग्वाही राव यांनी दिली. आखाती देशातून गॅस आणणारे जहाज उशिरा पोहोचत असल्याचा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. आॅनलाईन नंबर लाऊनही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचा सामना वितरकांना करावा लागत असल्याची कैफियत वितरकांनी मांडली. १५ दिवसांपासून गोदामात सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. पेट्रोलियम मागणी दरदिवसाला होत असताना ती पूर्ण केली जात नाही, ही समस्या वितरकांनी मांडली. दरम्यान आणि काही तांत्रिक अडचणी देखील कारणीभूत असल्याचे राव यांनी सांगितले. तीन दिवसात सिलिंडरचे वितरण सुरळीत होईल, असे त्यांनी वितरकांना आवर्जून सांगितले. बैठकीला शहरातील वितरक उपस्थित होते.
गॅस सिलिंडर वितरकांची बैठक
By admin | Published: February 17, 2017 12:23 AM