अमरावती : येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामागील हिंदू स्मशानभूमीचे कामकाज हाताळणाऱ्या हिंदू स्मशान संस्थेने गॅस दाहिनीवरील मृतदेहांचे अंत्यसंस्कार थांबविण्यात येत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांना २९ मे रोजी दिले. स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी विद्युत शवदाहिनीच्या धुडाची शुक्रवारी तोडफोड केली. त्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेने हे पाऊल उचलले आहे.
संस्थेच्या पत्रानुसार, दोन गॅस शवदाहिनी हिंदू स्मशानभूमीत अस्तित्वात आहेत. कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तेव्हा तिसरी शवदाहिनी लावण्याची तयारी करण्यात आली. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले व त्यांच्या निर्देशानुसार कोटेशन मागविण्यात आले. ही शवदाहिनी लवकरात लवकर मिळण्यासाठी हिंदू स्मशान संस्थेने १२ लाख रुपये आगाऊ भरले. यादरम्यान नागरिकांकडून याकरिता विरोध होत असल्याचे पाहून कबूल करूनही महापालिकेने रक्कम दिली नाही. ही माहिती प्रकाशित होताच माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वत:च्या ट्रस्टमार्फत रक्कम भरून तिसरी शवदाहिनी हिंदू स्मशानभूमीच्या पुढ्यात आणली. शुक्रवारी ती येताच स्थानिक नगरसेवकाने लोकांना स्मशानभूमीत आणले व त्यांनी शवदाहिनीचे सुटे भाग, सोल्यूशन बादल्या, क्रँक शाफ्टची तोडफोड केली. १५-२० जणांनी त्याचे धूड उलटविले. महिलांनी तुऱ्हाट्याचे गठ्ठे हिंदू स्मशान संस्थेच्या कार्यालयापुढे आणून जाळण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून धमकावले. विश्वस्त पदाधिकाऱ्यांनाही शिविगाळ करण्यात आली. याबाबत राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संस्थेने गॅस शवदाहिनी व अंत्यसंस्कार थांबविले असून, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या लेखी परवानगीनेच त्या सुरू करण्यात येतील. याशिवाय प्रशासनाने तिसरी शवदाहिनी उभारण्याची व कार्यान्वित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हिंदू स्मशान संस्थेने केली आहे.
---------
- आर.बी. अटल, अध्यक्ष, हिंदू स्मशान भूमी संस्था यांचा कोट येत आहे.