शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

गव्हाणकुंडच्या शाळेत निकृष्ट खिचडी !

By admin | Published: January 16, 2016 12:07 AM

तालुक्यातील गव्हाणकुंड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाची खिचडी विद्यार्थ्यांना दिली जात होती.

१८ जानेवारीला कुलूप : जि.प. सदस्यांची कारवाईची मागणीवरूड : तालुक्यातील गव्हाणकुंड येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाची खिचडी विद्यार्थ्यांना दिली जात होती. याबाबत अनेक वेळा पालक, नगारिक तसेच जि.प. सदस्या अर्चना मुरुमकर यांनी तक्रार करूनही दखल घेतली नाही. अखेर बुधवारी जि.प. सदस्य मुरुमकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी अधिकाऱ्यांना पाचारण केले. पं.स. शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा आहार निकृष्ट असल्याचा अहवाल देऊन कारवाईचे आश्वासन दिले. १८ जानेवारीपर्यंत कारवाई झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. वरुड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गव्हाणकुंड येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १७२ विद्यार्थी पटसंख्या आहे. आदिवासीबहुल भाग असल्याने गोरगरीब विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शासनाकडून शालेय पोषण आहारांंतर्गत खिचडी दिली जाते. परंतु ही खिचडी बेचव आणि निकृष्ट असल्याची ओरड पालकांसह नागरिकांकडून केली जात होती. या तक्रारीची दखल जिल्हा परिषद सदस्य अर्चना मुरुमकर, उपसरपंच प्रदीप मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बावणे, सरपंचा पुष्पा कोडापेंसह ग्रामसदस्यांनी घेऊन पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र, दखल घेण्यात आली नव्हती. अखेर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शाळेत जाऊन गटविकास अधिकारी रामकृष्ण पवार, गटशिक्षणाधिकारी व्ही.एन.इंगळे, केंद्रप्रमुखांना पाचारण करुन पंचनामा करण्यात आला. या शाळेत पुरक आहार देण्यात आला नाही. सादील खाते मुख्याध्यापकाच्या नावाने असून ते मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या नावाने करण्यात यावे यांसह खिचडी निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल तक्रारकर्त्यांना दिला. पं.स.शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा निकृष्ट पोषण आहार असल्याचा अहवाल देऊन कारवाईचे आश्वासन दिले. १८ जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी अर्चना मुरुमकर, उपसरपंच प्रदीप मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बावणे, सरपंच पुष्पा कोडापे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण युवनाते, रेखा मनोहरे, प्रतिभा गाडबैल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)सभापतींच्या स्वगृहातील वास्तव विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अर्चना मुरुमकर यांचे स्वगृह असलेल्या गव्हाणकुंडमधील जिल्हा परिषद शाळेतच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येते. इतरही अनेक कामात अनियमितता असून विद्यार्थी संख्या अधिक दाखवून तांदूळ खुल्या बाजारात विकले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शालेय पोषण आहाराचे वितरण करणाऱ्या ठेकेदारासोबत मुख्याध्यापकांचे संगनमत असल्याचेही बोलले जाते.