आज मतमोजणी : चार उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलअमरावती : महापालिका प्रभाग क्र. २६ गवळीपुरा सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक रविवारी पार पडली. ८ हजार ३७५ पैकी ४ हजार ४०८ मतदारांनी मतदान केले. एकूण ५२.६३ टक्के मतदान झाले असून सोमवारी मतमोजणी होणार आहे. यात चार उमेदवार भाग्य मतपेटीत सील झाले.या निवडणुकीत काँग्रेसच्या खातून बी शेख हातम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाहीन परवीन शेख करीम, अपक्ष बिलकीस बानो हमजा खान, आसीया अंजूम वहिद खान यांच्या तुल्यबळ लढत झाल्याचे चित्र आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ११.३० वाजतच्या सुमारास मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. यावेळी २५ टक्के देखील मतदान झो नव्हते. मात्र दुपारी ३ वाजेनंतर मतदान करण्यास एकच गर्दी झाली. विशेषत: महिला वर्गाची गर्दी लक्ष वेधणारी होती. सायंकाळी ४ वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी रांग लागली. सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या मतदानाच्या एकूण आकडेवारीनुसार ५२.६३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी वलगाव मार्गावरील अॅकॅडमिक हायस्कूल आणि डी.एड. कॉलेज हे दोन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मुस्लिमबहुल भागात ही पोटनिवडणूक होत असल्याने पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता. आयुक्त राजकुमार व्हटकर हे बारकाईने लक्ष ठेवून होते. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी मदन तांबेकर हे पोट निवडणुकीची संपूर्ण यंत्रणा हाताळत होते.
गवळीपुरा पोटनिवडणुकीत ५२.६३ टक्के मतदान
By admin | Published: November 02, 2015 12:25 AM