शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

आरोग्य, सिंचन विहिरीच्या मुद्यांवर आमसभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 6:00 AM

सभेच्या प्रारंभीच सदस्य शरद मोहोड यांनी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ५९ वसतिगृहांना अनुदान देतांना कोणीही अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नाहीत, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनी सीईओ अमोल येडगे यांन स्वत: भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पीएचसी रंगरंगोटी, वसतिगृहांच्या चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनमानी कारभार तसेच पावसाने खचलेल्या सिंचन विहिरींची मंजुरीच्या विषयावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अध्यक्ष बबलू देशमुख यांनी याप्रकरणी विशेष सभा घेण्याचे निर्देश सीईओंना दिले.सभेच्या प्रारंभीच सदस्य शरद मोहोड यांनी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ५९ वसतिगृहांना अनुदान देतांना कोणीही अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नाहीत, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनी सीईओ अमोल येडगे यांन स्वत: भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. मोर्शी तालुक्यातील ३०५ पैकी १२४ आणि वरूड तालुक्यातील सिंचन विहिरीचे ४७८ पैकी १४१ प्रस्तावांना जिल्हा परिषद प्रशासनाने मंजुरी दिली नसल्याचे सदस्य संजय घुलक्षे, सभापती विक्रम ठाकरे म्हणाले. सभेत प्रकाश साबळे, सुहासिनी ढेपे, दिनेश टेकाम आदींनी मुद्दे मांडलेत. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, सदस्य अभिजित बोके, सुरेश निमकर, जयंत देशमुख, दत्ता ढोमणे, सुनील डिके, पूजा हाडोळे, अनिता मेश्राम, पूजा येवले, सुहासिनी ढेपे, सीईओ अमोल येडगे, एसीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, प्रशांत थोरात, माया वानखडे, दिलीप मानकर, श्रीराम कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे, राजेंद्र सावळकर आदी उपस्थित होते.१६ विषयांवर चर्चा व निर्णयवार्षिक प्रशासन अहवालास मान्यता देणे, मग्रारोहयो अंतर्गत सन २०२०-२१ च्या कृती आराखडा लेबर बजेटसह सन २०१९-२० च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी, वनविभागाच्या एनओसीअभावी अखर्चित निधीतून नवीन कामास मंजुरी देणे, यासह अन्य विषयावर सभेत चर्चा करून काही विषयांना सभागृहाने मंजुरी प्रदान केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद