प्रधान सचिव नंदकुमार यांच्या हस्ते वितरण : प्राथमिक, माध्यमिक विभागाची कामगिरीधारणी : नांदगाव पेठ येथे आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय कला, क्रीडा व आनंद जत्राचा समारोप गुरुवारी झाला. या महोत्सवात धारणी पंचायत समितीने जनरल चॅम्पियन शिल्डसह प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियन शिल्ड पटकाविले. राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या हस्ते धारणीच्या चमुला जनरल चॅम्पियन शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय कला, क्रीडा व आनंद जत्रा महोत्सव नांदगावपेठ येथे २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात जिल्ह्यातील चौदाही पंचायत समितींमधील चमुंनी सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत सहभाग नोंदविला. सुमारे चार हजार विद्यार्थी - खेळाडंूसह शिक्षक सहभागी झाले होते. या महोत्सवाचा समारोप गुरुवारी झाला. बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय इंगळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे होते. प्रमुख उपस्थिती चंद्रशेखर खंडारे, चंदनसिंह राठोड, जयश्री राऊत, नितीन उंडे, आर. एन. लिखार, आरती देशपांडे, श्रीमती फातिमा, रंजना बोके, गणेश बोपटे, अशोक इंगळे, डी. यू. गावंडे आदींची उपस्थिती होती.या क्रीडा महोत्सवात सांघिक खेळात प्राथमिक विभागातून कबड्डी स्पर्धेत मुला-मुलींमध्ये धारणी पंचायत समिती विजयी झाली. खो-खो मुले चांदूरबाजार, खो-खो मुली धारणी, लंगडी मुली धारणीची चमू विजयी झाली. तसेच माध्यमिक विभागातून कबड्डी मुले नांदगाव खंडेश्वर, खो-खो मुले व मुली धारणी, व्हॉलीबॉल दर्यापूर पंचायत समिती विजयी झाली. या सर्व विजयी चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शिक्षक सहकारी बँकेच्यावतीने जनरल चॅम्पियन, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिल्ड देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमातील विजयी स्पर्धकांसाठी मुख्य लेखा अधिकारी चंद्रशेखर खंडारे, रत्नमाला टेकाडे, राजेश सावरकर व अर्चना सावरकर यांनी शिल्ड दिले. महोत्सवासाठी क्रीडा संयोजक नितीन उंडे व केंद्रप्रमुख जानराव सुल्ताने, डी. यु. गावंडे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत उंडे, जयकुमार कदम, अनिल वानखडे, संदीप अकोलकर, सतीश नांदणे, मनोज खोडके, विजय उभाड, मनोज ताकोते, दज्वल पंचवटे, उमेश उदापूरे, कैलास कावनपूरे, सचिन वावरकर, सुनील पांडे, मनीष काळे, तिमय्या तेलंग, आशीष भुयार, सुनील बोडखे, संजीव म्हात्रे, बसंत अकोलकर, रवींद्र ढोक, शोभा मालवे, संगीता सोनोने आदींनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक व अहवाल वाचन क्रीडा संयोजक नितीन उंडे यांनी केले. संचालन मनीषा धर्माळे यांनी, तर आभार वसंत मनवरकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
धारणीने पटकाविले जनरल चॅम्पियन शिल्ड
By admin | Published: February 06, 2017 12:10 AM