पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे मत धामणगाव रेल्वे : बदलत्या जीवन शैलीत वाढते आजार त्यात वाढलेल्या औषधीच्या किमती लक्षात घेता शासन, डॉक्टर व मेडिकल स्टोअर्स यांच्या त्रिसूत्रीपणामुळे दुर्धर आजारावरील औषधोपचार स्वस्त झाला आहे. जेनेरिक औषधी ही सर्व सामान्यांसाठी संजीवनी ठरत असल्याचे मत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केले़ धामणगाव तालुक्याचे केंद्रबिंदू असलेल्या शहरातील शास्त्री चौक येथे गुरूकृपा स्वस्त औषधी सेवेला पोटे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली़ अध्यक्षस्थानी भाजप नेते अरूण अडसड तर प्रमुख अतिथी नगराध्यक्ष प्रताप अडसड, उपाध्यक्ष देवकरण रॉय, पं़स़सभापती गणेश राजनकर, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, तहसीलदार सी.सीक़ोहरे, वैद्यकीय अधिकारी मनीष अप्तुरकर, भरत पालीवाल, असीत पसारी, अनुप ठाकरे, अनुप जगताप, विशाल डाफे यांची उपस्थिती होती़ शासनाने सामाण्यांच्या आरोग्या विषयी एक पाऊल पुढे टाकले आहे़ सर्वांना आरोग्य कार्ड पुढील काळात देण्यात येणार आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले जेनेरिक मेडीसीन ३० ते ७० टक्के स्वस्त मिळत आहे़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व पाच हजार लोकसंख्येच्या अधिक गावात मेडिकल स्टोअर्स उघडले जाणार असून दुर्धर आजारावर स्वस्त औषध उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालक मंत्री प्रवीण पोटे यांनी भाषणात सागितले़ जेनेरिक मेडिसनसंदर्भात विदर्भप्रमुख प्रशांत मोंडे, भरत पालीवाल यांनी अधिक माहिती दिली़ संचालन सागर ठाकरे, आभार दिनेश बोबडे यांनी मानले़ कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते़
जेनेरिक औषधे ठरणार संजीवनी
By admin | Published: April 23, 2017 12:27 AM