संत मुरलिदास महाराज : भव्य शोभायात्रा, महाप्रसादपूर्णानगर : जो प्रलयाची परिस्थिती पचवू शकतो, तोच जीवनात विजय मिळवू शकतो. कुणाची निंदा करून समाजात विष फैलाविण्यापेक्षा महोदवासाठ आपल्याच कंठात विष साठवा, अशा मौलिक उपदेश संत मुरलीदास महाराज यांनी पूर्णानगर येथे आयोजित भागवत कथेदरम्यान केला. दारूसंदर्भात महाराज म्हणतात ज्याच्या घरात दारू वास करते त्यांचा संसार कधीही सुखी नसतो. दारू पिण्याऱ्यांच्या घरात लक्ष्मी वास करीत नाही. म्हणून दारू पिऊन संसाराची राख रांगोळी करू नका, असे कळकळीचे आवाहन संत मुरलीदास महाराज यांनी केले. ते म्हणाले, मी पूर्णानगरवासीयांवर अपार प्रेम करतो. कारण ही माझी जन्मभूमी आहे. जेव्हा समाजात अधार्मिकता वाढते तेव्हा ऊर्जा, चेतना क्रुपीत होते आणि प्रलयाला वाट मिळते. आज समाजामध्ये वात्सल्याची कमतरता निर्माण झाली आहे. श्रीमद् भागवत कथेतून वात्सल्य करणे शिकता येते. या प्रवचनानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गोपाळकाला, महाप्रसादसंत मुरलीदास महाराज मठातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गोपाळकाल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेला महाप्रसाद रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. (वार्ताहर)
सन्मार्गाने यशश्री प्राप्त करा !
By admin | Published: March 04, 2016 12:08 AM