शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कृषी महोत्सवाने दिला नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:19 PM

शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.

ठळक मुद्देपत्रपरिषद : आत्माचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सव २७ ते ३१ जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदानावर घेण्यात आला. याद्वारे कृषिविषयक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न कृषी विभागाद्वारा करण्यात आला. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीनुसार स्थानिक शेतकºयांच्या उत्पादनांसाठी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत.विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्य महोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी २०० कक्षाद्वारे कृषीची महती व विक्री, विपणन आदीला चांगला प्रतिसाद मिळाला. परिसंवादमध्ये शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक दिसून आली. शेतकºयांना अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणी येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व्यवसाय करण्यावर भर द्यावा, यासह त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे शेतकºयांचे निरसन करण्यात आले. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले यांसह अनेक मान्यवर लोकप्रतिनिधींनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आत्माचे जिल्हा प्रकल्पप्रमुख खर्चान म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी जी.टी देशमुख, प्रदीप ओक व प्रगती अ‍ॅग्रोचे सुधीर जगताप यांच्यासह आदी उपस्थित होते.बचत गटांच्या स्टॉलवर ४७ लाखांची विक्रीया महोत्सवात जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील बचतगटांचे विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लागले होते. याला भरभरून प्रतिसाद मिळाला. गृहोपयोगी वस्तू, धान्य आदींची ४७ लाखांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली. महोत्सवाला किमान पाच हजार शेतकरी बांधवांनी भेट दिल्याचे ते म्हणाले.खारपानपट्यातील गावात आजपासून संवादजिल्ह्यातील खारपाणपट्टा असलेल्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीसाठी १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान संवाद साधण्यात येणार आहे. या भागासाठी ‘पोखरा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारणपणे दर्यापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये नियोजनासंदर्भात हा दौरा असल्याची माहिती अरविंद नळकांडे यांनी दिली.