कावली वसाड : लगतच्या वाठोडा येथील माजी सैनिक सुनील नगराळे या शेतकऱ्याने जय जवान जय किसान’ चा नारा देत अद्रकाची शेती केली. नगराळे यांनी देशाच्या सीमेवर तब्बल १९ वर्षे सेवा दिली. आपल्या गावी आल्यानंतर घरची शेती सांभाळण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. शेतात विहीर केली. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारची फळझाडांची लागवड केली. कापूस सोयाबीन या पिकांचे उत्पादन घेतले अवलंबून न राहता पारंपरिक पद्धतीला फाटा देत गेल्यावर्षी अद्रकाची अर्ध्या एकर शेतीत पेरणी केली.
अनेक शेतकऱ्यांची मार्गदर्शन घेत अद्रक पिकाचे योग्य संगोपन केल्याने तब्बल साठ किंटल अद्रकाचे उत्पादन घेतले. त्यामुळे या अद्रकाची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतावर येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने अद्रक लागवडीसाठी बेणे सुद्धा यावर्षी त्यांनी शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिल्याचे सांगितले.