---------------------------------------------------------------------------
उत्तमसरा येथे अवैध दारू जप्त
बडनेरा : पोलिसांनी नजीकच्या उत्तमसरा येथे कारवाई करून ५५० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. जानराव उत्तमराव तलवारे (४५, रा. भानखेडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------------------------------------------
नांदगावपेठ पोलिसांनी दारू पकडली
अमरावती : बोरगाव येथील किसन धाब्यावर कारवाई करीत नांदगावपेठ पोलिसांनी ७७४० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी किसन रमेश तांगडे (२८, रा. रहाटगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
----------------------------------------------------------
रेल्वेखाली येऊन युवकाची आत्महत्या
अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेखाली येऊन एका युवकाने आत्महत्या केल्याचे पाच बंगलानजीक रेल्वे रुळावर गुरुवारी उघडकीस आले. सोपान गणेश खरबळकर (२३, रा. धनज, ता. कारंजा, जि. वाशिम) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
----------------------------------------------------------
अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ वर्षीय एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस मृताच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत.