शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
3
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
4
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
5
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
6
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
7
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
8
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
9
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
10
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
11
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
12
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
13
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
14
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
15
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
16
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
17
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
19
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
20
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

विद्यार्थिनीला मारहाण करताना फुटेज मिळाले

By admin | Published: September 01, 2015 12:07 AM

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला थप्पडमार प्रकरण महीला पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत.

थप्पडमार प्रकरण : पीएसआयच्या अंगलट येण्याची चिन्हेअचलपूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला थप्पडमार प्रकरण महीला पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २९ आॅगस्ट रोजी वाहन परवाना जवळ का बाळगला नाही, या कारणावरून अचलपूरचे पोलीस उपनिरीक्षक तिरपुडे यांनी चावलमंडी येथे जगदंब महाविद्यालयाची विज्ञान शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी स्नेहल गजानन रोडगे (१९, रा. अभिनव कॉलनी) हिला कानशिलात लगावली होती. यात तिच्या कानाच्या आत दुखापत झाली. तिने उपजिल्हा रुग्णालयात कानावर उपचार केले होते. याची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचेकडे केली होती. यावेळी तिचे वकील व्ही.आर. घाटे उपस्थित होते. या प्रकरणामुळे अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोर्चाची तयारी सुरू आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक गौतम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बी. डी. पौनिकर यांना दिले आहेत. स्रेहल रोडगे हिला भररस्त्यात मारहाण करून अपमानित करणाऱ्या पीएसआय तिरपुडे यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नरेंद्र फिसके, माजी सरपंच दिलीप राऊत, सतीश आकोलकर, विनय चतूर, नगरसेवक संजय भोंडे, माधुरी शिंगणे, श्रीधर क्षीरसागर आदींनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)