शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

महिलेने मुलीसह घेतली रेल्वेसमोर उडी, चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:06 PM

दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वीच पतीने दिला जीव : मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला. ती ढासळली. तिचे मनोबल खचले. जगण्याचा उद्देशच समाप्त झाला. नैराश्याच्या खोल गर्तेत गटांगळ्या खात असतानाच कोणताच मार्ग न गवसल्याने तिने मंगळवारी पहाटे ३ वाजता अडीच वर्षांच्या चिमुरडीसह रेल्वेसमोर उडी घेतली. दुर्देवाने चिमुकली दगावली आणि डावा हात गमावून ती मात्र जीवन-मृत्युचा संघर्ष करते आहे.आराध्या राहुल मिश्रा (अडीच वर्षे) असे मृत चिमुरडीचे तर पिंकी उर्फ प्रियंका राहुल मिश्रा (२४) असे जखमी महिलेचे नाव आहे.अंगावर शहारे आणणारी ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजता मॉडेल रेल्वे स्थानकानजीक चिचफैल परिसरातील रेल्वे ट्रॅकवर घडली. अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवार २० आॅगस्ट रोजी पिंकीचे पती राहुल ब्रह्मदेव मिश्रा (३०, मूळ रहिवासी उत्तरप्रदेश, ह.मु.कल्याणनगर ) याने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली होती, हे विशेष. राहुल मिश्रा हा एका पॅथॉलॉजीत रक्त तपासणीचे काम करीत होता. कल्याणनगरात भाड्याच्या खोलीत राहून याच नोकरीच्या भरवशावर तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.मला जगायचेच नाहीमात्र, काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याचे नातलगांनी सांगितले. याच तणावातून त्याने आत्महत्या केली. पतीनिधनाच्या आकस्मिक धक्क्याने त्याची पत्नी पिंकीचेही मानसिक संतुलन ढासळले होते. त्यामुळे कुुटुंबीयांनी तिला चिचफैल येथील राहुलच्या काकांकडे आणून सोडले होते. मंगळवारी पहाटे कुणालाही न सांगता ती मुलीला घेऊन रेल्वे स्थानकाकडे निघाली. तिने थेट अमरावती-बडनेरा रेल्वेसमोर मुलीसह उडी घेतली. या अपघातानंतर रेल्वे थांबली. रेल्वे कर्मचाºयांनी गाडीखालून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, जखमी अवस्थेतही ती ‘मला जगायचे नाही, मरू द्या..’ असा टाहो फोडत होती. या घटनेत चिमुरड्या आराध्याचा मात्र जागीच मृत्यू झाला तर पिंकीचा एक हात शरीरापासून वेगळा झाला. आराध्याचा मृतदेह विच्छेदनासाठी इर्विनला आणण्यात आला.