संदीप मानकर अमरावतीफेसबुकवर विद्यार्थिनीच्या नावे ‘फेक’ अकाऊंट तयार केले. त्यावर आलेल्या फ्रेण्ड रिक्वेस्टही स्वीकारल्या. त्यानंतर या अकाऊंटवर अश्लील संदेश आण छायाचित्रे येण्यास सुरूवात झाली. परिणामी विद्यार्थिनीची बदनामी झाली. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर हे फेक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीला सायबरसेलच्या पोलिसांनी १२ जानेवारी रोजी अटक केली सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. सोबतच सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. सायबर सेल अमरावती ग्रामीण पोलिसांना चार महिने सलग तपास करुन हा किचकट गुन्हा उघडकीस आणला. सचिन सुधाकर गायगोले वय (२७,रा.लोणी) याने येथीलच एका विद्यार्थिनीच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केले. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्या अकाऊंटवर इतरांच्या फ्रेन्ड रिकवेस्ट स्वीकारल्या. काही दिवसांनी त्या अकाऊंटवर अनेक अश्लील साहित्य व संदेश येऊ लागले. विद्यार्थिनीच्या इतर मैत्रीणींकडून तिला ही बाब कळली. विद्यार्थिनीच्या मानसिकतेवर परिणामअमरावती : तोवरही बाब तिच्या ओळखीच्या लोकांमध्ये कर्णोपकर्णी झाली होती. या बाबीचा विद्यार्थिनीच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाली. तिची आणि तिच्या कुटूंबाची मनोदशा बिघडली. महाविद्यालयात जाणेही ती टाळू लागली. हा प्रकार वाढल्याने अखेर तिने लोणी पोलिसांत धाव घेतली. लोणी पोलीस ठाण्यात तिने तक्रार नोंदविली १ सप्टेंबर २०१५ रोजी त्या विद्यार्थिनीला हा प्रकार कळला होता. लोणी पोलिसांनी याप्रकरणी ५ सप्टेंबर २०१५ ला याप्रकरणी आयटी अॅक्टनुसार ६६(सी) गुन्हा दाखल केला होता. लोणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण सायबर सेलकडे सोपविला. ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम व अप्पर पोलीस अधिक्षक एम.एम.मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक विशाल खलसे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद राऊत, राजेंद्र पंचगाम, मोहन मोहोड, सुधीर पांडे, अमित वानखडे, शाम गावंडे आदींनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव करीत आहेत.
फेसबुकवर ‘फेक’अकाऊंट तयार करून विद्यार्थिनीचा छळ
By admin | Published: January 15, 2016 12:23 AM