शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी, पुरस्कार १०० रुपयांचा!

By admin | Published: April 05, 2016 3:11 AM

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या जिल्ह्यातील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना

अमरावती : मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या जिल्ह्यातील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. निवड करण्यात आलेल्या पुरस्कर्त्यांना प्रत्येकी १०० रूपये रोख आणि प्रमाणपत्र वितरित करावे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळविणाऱ्यांनी पुरस्काराबाबत समाधान व्यक्त केले असले तरी चांगल्या व समाजोपयोगी कामाची किंमत केवळ १०० रुपयेच का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिक्षणातील मुलींचा टक्का वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘बेटी बचाव - बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत राज्यात मुलींची उत्कृष्ट पटनोंदणीही करण्यात आली.निवड समितीमार्फत निकषप्राप्त प्रस्तावाची निवड करण्यात येऊन पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्यांची यादी घोषित करण्यात आली. तथा निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत १०० रुपये व प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)४५१ पुरस्कर्त्यांना ४५,१०० रुपयांचे ‘बक्षीस’४जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे ४५ हजार १०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ४३१ प्राथमिक शिक्षक पुरस्कृत४मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार योजनेंतर्गत ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यात अचलपूर पंचायत समितीमधील १८, अमरावती ४३, अंजनगावमधील १३, भातकुलीतून ११, चांदूरबाजार १, चिखलदरा ३०, चांदूररेल्वे ६०, दर्यापूर ४, धारणी ६, धामणगाव रेल्वे ४८, मोर्शी ५८, नांदगाव खंडेश्वर ४५, तिवसा व वरूड पंचायत समितीमधील प्रत्येकी ४३ असे एकूण ४३१ प्राथमिक शिक्षक व २० शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कृत होतील. मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना १०० रुपयांचा भव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वाह रे शासन ! कार्यक्रम घेण्याचीही तसदी घेतली नाही. - राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती