शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तोकड्या कपड्यात थिरकतात मुली

By admin | Published: May 12, 2017 1:34 AM

सैराट, झिंगाट अशी विशेषणेही उणी पडावीत, अशी मदमस्त झिंग, तोकड्या कपड्यांमधील मादक मुलींचे बेभान नृत्य

अंबानगरीत हे काय ? : अर्धनग्न मुलींच्या कमरेत हात अन् डीजेच्या तालावर नाच लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सैराट, झिंगाट अशी विशेषणेही उणी पडावीत, अशी मदमस्त झिंग, तोकड्या कपड्यांमधील मादक मुलींचे बेभान नृत्य अन् मद्याचा कैफ थिटा पाडणारे हर तऱ्हेच्या हुक्क्याचे झुरके, हे दृश्य कुण्या डान्स बारमधील नव्हे तर सुसंस्कृत अंबानगरीच्या एका हुक्का पार्लरमधील आहे. हो, हे खरे आहे. विशी-पंचवीशीतील तरूणाईला देहभान हरपून वेगळ्याच जगात झिंगलेल्या अवस्थेत बघायचे असेल तर बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा -२७’ या हुक्का पार्लरचा एक फेरफटका पुरेसा ठरतो. सध्याच्या तरूणाईचे नवे ‘स्ट्रेस किलर’ आणि ‘हबल-बबल’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या घातक हुक्का संस्कृतीने आता पावन अंबानगरीत प्रवेश केला आहे. अलिकडेच पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या हुक्का पार्लरमधील झुरके आणि ओंगळवाणा नृत्यप्रकार पद्धतशीरपणे दडपण्यात आला; तथापि ‘अड्डा -२७’मध्ये नेमके काय चालते, हे वास्तव उघड करणारी दृश्यफित ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. कर्णकर्कश संगीताच्या तालावर बेधुंदपणे थिरकणाऱ्या तरूणी आणि बिनधास्तपणे हुक्क्याचे झुरके ओढून रंगीबेरंगी धूर सोडणारे तरूण या चित्रफितीत स्पष्ट दिसतात. हुक्क्याचा ‘कश’ ओढायचा अन् अर्धनग्न तरूणींच्या कंबरेत हात घालून नृत्य करायचे, असली संस्कृती या हुक्का पार्लरमध्ये जोपासली जात आहे. अमरावतीची शालिन संस्कृती बाधित करणाऱ्या या मुद्याला एकट्या बजरंग दलाने हात घातला आहे. सत्तेत असलेला संस्कृती रक्षक भाजपक्ष आणि मराठी अस्मितेचा बाणा जपणारा शिवसेना पक्ष गप्पच आहे. हुक्का पार्लर चालविणारी मंडळी धनिक आहेत. सत्ताही सोबत असल्याचा त्यांचा दावा आहे. विरोधानंतरही असले पार्लर चालणार असतील तर ते दावे खरेच म्हटले पाहिजे. शहरातील सहा हुक्का पार्लर तूर्तास बंद अड्डा २७- बसस्थानक रोड, मधुरम -गोपालनगर, कसबवा हुक्का बार -तपोवन, हॉट स्पॉट कॅफे-अंबादेवी रस्ता, वायफाय कॅफे -एमआयडीसी, फुड इन -राठीनगर या शहरातील सहा हुक्का पार्लर्सना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तूर्तास स्थगिती आदेश बजावले आहेत. पार्लर चालकांना हजर करण्याचे आदेशही सीपींनी दिले. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर हुक्का पार्लर बंद करण्यासाठी निवेदन दिले होते. ‘लोकमत’ने हा विषय शोधक पद्धतीने लोकदरबारात मांडल्यानंतर शहर पोलिसांनी सदर मुद्याची गंभीर दखल घेतली आहे.