शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हवं तर बाळासाहेबांचे नाव द्या, मात्र ‘स्कायवॉक’ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 5:00 AM

विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाटातील चिखलदरा. चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण (हील स्टेशन) विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना तत्कालीन सरकारच्या कारकिर्दीत होती. आज ही भावना दिसत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. तत्कालीन सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्काय वॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देआदित्य ठाकरे यांना नवनीत राणा यांचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :  देशातील पहिल्या स्काय वाॅकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, आमची काही हरकत नाही. परंतु रखडलेला प्रकल्प मार्गी लावा, असे पत्र खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिले आहे. अडीच वर्षापासून रखडलेल्या चिखलदरा येथील देशातील पहिल्या स्काय वॉकच्या कामासाठी  खासदार नवनीत राणा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून परवानगी व निधीसंदर्भात मागणी केली आहे.विदर्भातील अप्रतिम सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे मेळघाटातील चिखलदरा. चिखलदरा म्हणजे विदर्भातील जनतेसाठी थंड हवेचे ठिकाण (हील स्टेशन) विदर्भाचा विकास जलदगतीने होत असल्याची भावना तत्कालीन सरकारच्या कारकिर्दीत होती. आज ही भावना दिसत नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. तत्कालीन सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्काय वॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात असून, गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉइंट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्कायवॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण त्याचे काम अर्धवट आहे. या स्काय वॉकवर उभे राहून पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावरील काचेच्या प्लॅट फॉर्मवर उभे राहून ५०० फूट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे

विदर्भाकडे लक्ष द्या आदित्य ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. तसेच विदर्भाकडेही लक्ष द्यावे. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. हा स्काय वॉकही तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने याकडे लक्ष देऊन स्काय वॉकला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायला आमची हरकत असणार नाही, असेही खासदार नवनीत राणा यांनी पत्रातून म्हटले आहे.

पोलिसांतून सुटले वनविभागात अडकलेस्कायवॉकचे काम आधी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेच्या आक्षेपाने अडविले गेले आणि कित्येक दिवस ते बंदच होते. त्या कचाट्यातून कसेबसे सुटले. आता  वन व वन्यजीव मंडळाच्या कचाट्यात अडकले आहे. वनखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावू शकता, असे खा.राणा म्हणाल्या. 

आादिवासींना न्याय द्याचिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल, अशा या स्काय वॉकचे काम पर्यटनमंत्री म्हणून आपण पूर्ण केल्यास तेथील गोरगरीब आदिवासींना वाढत्या पर्यटनातून रोजगाराची संधी मिळेल, अशी अपेक्षा खा. नवनीत राणा यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रातून वर्तविली आहे. आदिवासींच्या हितासाठी हा प्रकल्पपूर्ण व्हावा.

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाChikhaldaraचिखलदरा