शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

By admin | Published: April 19, 2015 12:21 AM

राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील ...

लक्षवेध : बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना, वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याची मागणीअमरावती : राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांनाच विकला आहे. आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस पणन महासंघाला विकला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादकांना बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सर्व फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यापेक्षा कापूस उत्पादकांना सरसकट मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ तोडगा यावर काढावा, अशी मागणी होत आहे. राज्यभरातील १ कोटी पेक्षा जास्त क्विंटल खरेदी केलेल्या कापसाला ३०० रुपये बोनस देण्याचा विचार झाला तरी ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाते. यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात किती रक्कम पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कापूस उत्पादनाच्या वेळी चांगले भाव दिले तर शेतकऱ्यांना त्वरित पैशांची मदत होते. शेतकऱ्यांना गावातून कापूस खरेदी केंद्रापर्यंत कापूस आणण्याचा खर्च सोसवत नाही. अशावेळी गावातील व्यापाऱ्याला कापूस विकला जातो. किंवा मोठा व्यापारी गावातच वाहन घेऊन जागेवर चुकारे देतात. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यालाच कापूस विकतात. आलेला कापूस साठवून ठेवावा आणि चांगले भाव आल्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी आणावा, अशी तयारी शेतकऱ्यांची नसते. तोपर्यंत त्यांना थांबताही येत नाही. त्यामुळे शेतातून घरी आणलेला कापूस थेट व्यापाऱ्यांच्या दारात नेऊन टाकावा लागतो. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांनाच विकला. शासनाकडे अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जो कापूस शेतकरी व्यापाऱ्यांना विकतात, अशा कापसाला शासनाने प्रतिक्विंटल काही बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कदापिही होणार नाही. अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्यातील १२६ कापूस खरेदी केंद्रावर १ कोटी ७ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यातील पणन महासंघाने खरेदी केलेला कापूस २६ लक्ष ९४ हजार क्विंटल तर सीसीआयने खरेदी केलेला कापूस ८० लाख ७८ हजार क्विंटल आहे. शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत होते तेव्हा हा कापूस ३८०० ते ३९०० रुपये भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. अनेक व्यापाऱ्यांनी हाच कापूस पणन किंवा सीसीआयला घातला काही शेतकऱ्यांनी थेट पणन महासंघाच्या अथवा सीसीआयला आपला कापूस विकला असेल. पण अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे. त्यामुळे बोनस संदर्भात शासनाने निर्णय घेतल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)शासनाने एकतर कापूस खरेदी कें द्र उशिरा सुरू केले अन् लवकरच बंदही केले. त्यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ घेता आला नाही. अशातच दुष्काळ व गारपिटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देताना सरकट १० हजार रुपये शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा करावे.- विजय विल्हेकर, शेतकरी नेते.