आॅनलाईन लोकमतअमरावती: शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी जे अहोरात्र झिजले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली तसेच देशाचे पहिले कृषिमंत्री होते, असे भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जिल्ह्यालाच नव्हे, देशाला गर्व आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘भारतरत्न’ देऊन गौरव करावा व बेलोरा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी आयएमएने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना निवेदनाद्वारे केली.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अमरावती शाखेच्या बैठकीत कार्यकारिणीने याविषयीचा ठराव एकमताने संमत केलेला आहे. समाजातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, नेते व संस्थानी एकत्र येऊन व भाऊसाहेबांप्रति कृतज्ञतेची भावना ठेवून असे ठराव पारित करावेत आणि शासनाकडे मागनी रेटून धरावी, असे आवाहन आयएमए पदाधिकाºयांनी यावेळी केले.जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना आयएमएचे अध्यक्ष बी.आर. देशमुख, पद्माकर सोमवंशी, माजी राज्य अध्यक्ष उद्धवराव देशमुख, माजी राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे, उपाध्यक्ष अशोक लांडे, सचिव दिनेश वाघाडे, दिनेश ठाकरे, दिगंबर धुमाळे, उदय जावरकर, निरज मुरके, एस. के. पुन्शी, घुंडियाल, आशिष साबू, मनोज गुप्ता, बेलोकार, गोपाल राठी, संदीप दानखेडे, नागलकर, श्यामसुंदर सोनी आदी यावेळी उपस्थित होते.
भाऊसाहेबांना भारतरत्न अन् विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:10 PM
शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी जे अहोरात्र झिजले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली तसेच देशाचे पहिले कृषिमंत्री होते, असे भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जिल्ह्यालाच नव्हे, देशाला गर्व आहे.
ठळक मुद्देआयएमए आग्रही : पूर्णाकृती पुतळा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन