लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना तुरीवर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस शासनाने द्यावे, अन्यथा प्रहारच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.आ. कडू यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तूर व चणा खरेदी, चुकारे, पीकविमा, बोंडअळी, गारपीट अनुदान तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी आ. कडू यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांकडून आढावा घेतला. तुरीचे पैसे व अन्य मागण्यांसाठी अलीकडेच प्रहारने पालकमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली. जिल्ह्यात चुकाºयासाठी आवश्यक २९१ कोटींपैकी २०१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित ९० कोटींपैकी ५० कोटी १४ जूनपर्यंत प्राप्त होणार असल्याचे कडू यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना किती पैसे वितरित केले, याचा लेखाजोखा त्यांनी जाणून घेतला. यावर जिल्हाधिकारी बांगर यांनी आमदारांच्या सूचनेप्रमाणे ज्याचे चुकारे थकीत होते, अशा जुन्या शेतकऱ्यांना प्राधान्याने रक्कम देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्व मुद्द्यांवर योग्य कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, महेंद्र जवंजाळ, प्रहार कार्याध्यक्ष मंगेश देशमुख, शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख चंदू खेडकर, शहरप्रमुख जोगेंद्र मोहोड, प्रदीप चौधरी, राहुल खापरे, दीपक भोंगाळे, अनूप मारुळकर, अंकुश जवंजाळ, शुभम ठाकरे, आरडीसी नितीन व्यवहारे, पुरवठा अधिकारी टाकसाळे, मार्केटिंग अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थिती होती.हमीभाव न मिळण्यास जबाबदार कोण?शासनाने तूर खरेदी केंदे्र बंद केली. अशातच शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली; मात्र तुरीचे मोजमाप झाले नाही. त्यामुळे आता खरेदी केंद्रावर तुरीची आवक वाढल्यास हमीभाव तर मिळाला नाहीच; उलट भाव पडण्याने शेतकऱ्याचे नुकसान होईल. त्यामुळे शासनाने एक हजारांऐवजी दोन हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहारने केली आहे.२३ जूनला बँकांच्या तक्रारीसाठी जनतादरबारपीकविमा, बोंडअळी, गारपीट आणि कर्जप्रकरणे यासंदर्भात बँकांकडून शेतकऱ्यांना असहकार्य होत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत प्रहारच्यावतीने २३ जून रोजी जनता दरबार अमरावती येथील विश्रामगृहात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना संबंधित तक्रारी लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन आ.बच्चू कडूृ यांनी केले आहे.
बोनस द्या, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:00 PM
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना तुरीवर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस शासनाने द्यावे, अन्यथा प्रहारच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.
ठळक मुद्देजिल्हा कचेरीत बैठक : बच्चू कडूंनी दिला इशारा