लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चुकीचे निदान करून औषधोपचार करणाऱ्या एका डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई म्हणून तीन लाखाच्या नुकसान भरपाईसह तक्रारीचा १ लाखांचा खर्च देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला. १२ नोव्हेंबर रोजीच्या या निर्णयानंतर ३० दिवसांच्या आत ही रक्कम देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बोपी येथील अंबादास शामराव अळसपुरे (६५) यांनी ३ डिसेंबर २०१६ रोजी ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. अळसपुरे यांची पत्नी रत्नकला यांना पोटात दुखणे व थकल्यासारखे वाटत होते. त्यांनी पत्नीला २२ डिसेंबर २०१४ रोजी ह्यदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. राजेंद्र ढोरे (५०, रा. कल्याणनगर) यांच्या हॉस्पीटलला नेले. डॉ. ढोरे यांनी रत्नकला यांच्या तपासण्या केल्या व औषधोपचार केले. त्यानंतर डॉ. रवींद्र कलोडे यांचा क्षयरोगाबाबत कोणताही स्पष्ट निष्कर्ष नव्हता. मात्र, डॉ. ढोरे यांनी रत्नकला यांच्यावर क्षयरोगाचा उपचार केला. त्यानंतर डॉ. संघई यांच्याकडे रक्त व यकृत चाचणीत केवळ क्षयरोगाची शक्यता वर्तविली. ते पूर्णत: व अंतिम निष्कर्ष नव्हता. डॉ. ढोरेच्या उपचारात प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून अळसपुरे यांनी पत्नीला डॉ. राजेश मुंदे व डॉ. सारडा यांच्याकडे दाखविले. त्यावेळी त्यांना क्षयरोग नसल्याची खात्री झाली. त्यामुळे गैरअर्जदार डॉ. ढोरे यांच्या चुकीच्या निदानामुळे व क्षयरोगाच्या उपचाराची आवश्यकता नसताना उपचार केला, औषधोपचारास विलंब झाला, रुग्णाला मुदतीत व योग्य औषधोपचार न मिळाल्याने पत्नी रत्नकला मरण पावली, असा आरोप अंबादास यांनी केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून ग्राहक मंचाने दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर ग्राहक मंचाला विरुद्ध पक्षाच्या सेवेत सदोषता, त्रुटी व निष्काळजीपणा आढळला. त्यानुसार ग्राहक मंचाने निर्णय देत गैरअर्जदारांना आदेशीत केले. विरुद्ध पक्षाने तक्रारदारास ३ लाख रुपयांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानीची नुकसान भरपाई द्यावी. शिवाय तक्रारदाराला झालेल्या १ लाखांचा खर्च ३० दिवसांच्या आत द्यावा, आदेशाचे पालन करावे, अन्यथा हुकूम आदेशापासून तक्रारदाराला देय रकमेवर दर साल दर शेकडा १२ टक्के व्याज देण्यास बांधील असेल, असे गैरअर्जदाराला आदेशीत केले.
रुग्णाच्या कु टुंबीयांना चार लाख द्या ग्राहक मंचचा डॉक्टरला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:14 AM
चुकीचे निदान करून औषधोपचार करणाऱ्या एका डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई म्हणून तीन लाखाच्या नुकसान भरपाईसह तक्रारीचा १ लाखांचा खर्च देण्याचा निर्णय ग्राहक मंचाने दिला.
ठळक मुद्देचुकीचे निदान केल्याने रूग्णाचा मृत्यू : टीबी नसताना केले उपचार